राष्ट्रीय ग्रंथपाल दिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय ग्रंथपाल दिन कार्यक्रम
राष्ट्रीय ग्रंथपाल दिन कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रंथपाल दिन कार्यक्रम

sakal_logo
By

43050
माध्यम कोणतेही असो वाचन महत्त्वाचे
डॉ. सतीश घाळी ः वाचनकट्टा, ‘कनवा’तर्फे ग्रंथपाल दिन

कोल्हापूर, ता. १३ ः ग्रंथपाल दिनाच्या औचित्याने वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था व करवीरनगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला, ग्रंथालयाकडे’ हा उपक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी उपस्थित होते.
डॉ. घाळी म्हणाले, ‘‘वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या जीवनाचे सोने झाले. अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले, तर राईटस ऑफ मॅन हे थॉमस पेन यांचे पुस्तक वाचून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली, त्यामुळे ते महान क्रांतिकारक झाले.’’
करवीरनगर वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी म्हणाले, ‘‘ग्रंथालयामध्ये असलेले विविध प्रकारचे ग्रंथ वाचले पाहिजेत. ज्ञानाचा खजिना सर्वांनी ग्रंथालयामध्ये जाऊन पाहिला पाहिजे, वाचनामुळे माणूस समृद्ध होतो.’’
संस्थेच्या ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी प्रास्ताविक केले. वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम यांनी स्वागत केले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, नेहरू विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंगल गायकवाड आदींनी मनोगते व्यक्त केली. ‘वाचनकट्टा’च्या सचिव वनिता कदम यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी चरणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे खजानीस उदय सांगवडेकर, उद्योजक महादेव पवार, राधिका कोळेकर, सायली पाटील, सुजाता पाटील, ओंकार कागीणकर, प्रतिभा खेडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86925 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..