स्वच्छतागृह वापरासाठी पैशाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतागृह वापरासाठी पैशाची मागणी
स्वच्छतागृह वापरासाठी पैशाची मागणी

स्वच्छतागृह वापरासाठी पैशाची मागणी

sakal_logo
By

43096
------------
स्वच्छतागृह वापरासाठी पैशाची मागणी
इचलकरंजीत मनसे आक्रमक : तणावाची परिस्थिती

इचलकरंजी, ता. १३ ः इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकामधील स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून शुल्क आकारले जात असल्याने मनसेकडून मक्तेदारास जाब विचारला. या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार करत संबंधित मक्तेदारास धारेवर धरले. त्यामुळे बस स्थानकामधील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शुल्क आकारणीचा फलक फाडून टाकत महिलांना स्वच्छतागृह विना शुल्क वापरण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने हिसका दाखवू, असा इशारा दिला.
येथील मध्यवर्ती बस स्थानकात असलेल्या स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून पाच रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना समजली. त्याची खात्री करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकास भेट दिली. या वेळी महिलांना स्वच्छतागृह वापरासाठी पाच रुपये शुल्क असा फलक पहायला मिळाला. त्यामुळे मनसे महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक होत संबंधित मक्तेदारास जाब विचारत धारेवर धरले. यामुळे बस स्थानकातील स्वच्छतागृह परिसरात नागरिकांची गर्दी होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर संतप्त मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा आगारप्रमुख कार्यालयाकडे वळवला. तेथे अधिकारी काकडे यांची भेट घेऊन त्यांना संबंधित गैरप्रकार दाखवून देत मक्तेदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी केली. यावर काकडे यांनी स्वच्छतागृह मक्तेदारावर कारवाई करु, असे आश्वासन दिले. प्रताप पाटील, रवी गोंदकर, स्मिता पवार, छाया कोरवी, पद्मावती इंगवले, मनोहर जोशी, शहाजी भोसले, महेश शेंडे, बाळासाहेब राजमाने, रामचंद्र बागलकोटे, योगेश दाभोळकर, अनिल झाडबुके, रोहित कोटकर, आनंदा कमलाकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86951 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..