जयसिगपूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिगपूर
जयसिगपूर

जयसिगपूर

sakal_logo
By

शिरोळ तालुक्यासह
जयसिंगपुरात प्रतिसाद
जयसिंगपूर, ता. १३ : शिरोळ तालुक्यासह जयसिंगपुरात हर घर तिरंगा उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.
नगरपालिका शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम झाले. शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा यांचे आयोजन करणेत आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे दुष्परिणाम, हर घर झेंडा याबाबत व्याख्यानांचे आयोजन, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार यासारखे कार्यक्रम आयोजित केले. या निमित्ताने जयसिंगपूरमधील उद्योजक सागर आडगाने आणि परिवार यांनी बालकांची पंगत या उपक्रमअंतर्गत नगरपालिकेच्या शाळांमधील ९०० विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस फळे व खाऊ वाटप केले. सर्व शाळांनी हर घर झेंडा जनजागृती साठी शाळेच्या परिसरात प्रभात फेऱ्या काढल्या. सकाळी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर व शिक्षण विभागामार्फत शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकांची मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत शिरोळ तालुक्याच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, श्री. वाघ साहेब, श्री. मेघन देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87005 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..