इचल: पंचगंगा नदी प्रदुषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: पंचगंगा नदी प्रदुषण
इचल: पंचगंगा नदी प्रदुषण

इचल: पंचगंगा नदी प्रदुषण

sakal_logo
By

इचलकरंजी, ता.13 ः पंचगंगा नदीमध्ये गणेश मुर्ती विसर्जन करण्याचा निर्णय झाल्यास कांही पर्यावरण प्रेमी नागरिक थेट न्यायालयाच्या जाण्याच्या तयारीत आहेत. यंदा गणेश मुर्ती पंचगंगा नदीमध्ये विसर्जीत करण्याची भूमिका कांहीजणांनी घेतली आहे. त्याला आता पर्यावरण प्रेमी नागरिकांतून वाढता विरोध होत आहे. याबाबत `सकाळ`ने घेतलेल्या रोखठोक भूमिकेचे स्वागत करतांना पंचगंगा नदी प्रदुषण थांबलेच पाहिजे, अशी भूमिका अनेक नागरिकांनी घेतली आहे.
यापूर्वीच इचलकरंजीतून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना सूचविल्या आहेत. त्यामध्ये गणेश मुर्ती पंचगंगा नदीमध्ये विसर्जीत न करता पर्याय निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून दरवर्षी मुर्ती दान उपक्रम राबविला जातो. त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाही प्रशासनाकडून तशी तयारी करण्यात येत आहे. एकिकडे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाबाबत तयारी सुरु असतांना पंचगंगा नदीमध्ये गणेशमुर्ती विसर्जनाची भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला आता पर्यावरण प्रेमी नागरिकांतून विरोध होत आहे.
दरम्यान, `सकाळ`ने याबाबत आज `जल्लोष म्हणजे प्रदूषण करायचे का?` या मथळ्याखाली आज रोखठोक भूमिका मांडली. त्याचे अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी स्वागत केले. पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी सकाळच्या भूमिकेला आपला पाठिंबा व्यक्त केला. तर कांही पर्यावरण प्रेमींनी पंचगंगा नदीमध्ये गणेश मुर्ती विसर्जनास परवानगी दिल्यास थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. लवकरच याबाबत संबंधितांना नोटीसा देण्याचीही तयारी करण्यात आहे. विशेष म्हणजे पर्यावरण पूरक गणेश मुर्तींचे विसर्जन होण्यासाठी पुढील काळात प्रबोधनात्मक मोहिम हाती घेण्याचीही तयारी कांही सामाजिक संस्थांनी दर्शवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87008 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..