राष्ट्रीय लोकअदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोकअदालत
राष्ट्रीय लोकअदालत

राष्ट्रीय लोकअदालत

sakal_logo
By

४३१३७

लोकअदालतीत एक हजार ९४० खटले निकाली
---
२३ कोटींहून अधिकची तडजोड; जिल्ह्यात ६१ संसारांची पुन्हा घडी बसविली
कोल्हापूर, ता. १३ ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीत एक हजार ९४० खटले निकाली निघाले. यात २३ कोटींहून अधिकची तडजोड रक्कम मंजूर करण्यात आली. आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. सी. चांडक, जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. एफ. सय्यद, एस. आर. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत झाली. न्यायालयीन कर्मचारी, वकील वर्ग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रीतम पाटील यांनी सांगितले. लोकअदालत दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, सहकार, कामगार, कौटुंबिक न्यायालयात घेतली. त्यासाठी जिल्ह्यात १३ विधी सेवा समित्या आणि ६१ पॅनेलद्वारे याचे कामकाज चालले. यात पती-पत्नीच्या वादाचे ६१ खटले तडजोडीने मिटवून पुन्हा त्यांचे संसार फुलविले.

कागलमध्ये ३६ प्रकरणांत तडजोड
कागल : येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. प्रकरणांत १० लाख ६० हजार ९२९ रकमेची वसुली झाली. प्रलंबित दिवाणी प्रकरणांपैकी १४ व फौजदारी १३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन सदर प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोड प्रकरणांत सहा लाख ६२ हजार २१० इतक्या रकमेची वसुली झाली. दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. ॲड. श्रीमती ए. ओ. दिवाण यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश ए. बी. जवळे तसेच वकील, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

एक कोटी २३ लाखांची
पेठवडगावात वसुली
पेठवडगाव : येथील लोकअदालतीत ३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तडजोडीत एक कोटी २३ लाख २४ हजार रुपयांची वसुली झाली. एकूण ९६५ दाखल प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे मिटविण्यात आली. दिवाणी न्यायाधीश एल. एम. पठाण यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्‍घाटन झाले. न्यायाधीश एस. डी. सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ॲड. रजनी कुलकर्णी, ॲड. राजशीला शिंदे यांनी पॅनलवर काम पाहिले. या वेळी सहायक अधीक्षक एस. एस. दिवाण, न्यायालयायीन कर्मचारी, पोलिस व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चौकट ः
मोटार अपघातात तडजोडी
लोकअदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाईचा एक दावा तडजोड होऊन त्याचे ३९ कोटी ३८ लाख सहा हजार ६११ रुपये मंजूर केल्याचे विधी सेवा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

तडजोड झालेले खटले
भूसंपादन- १
स्पेशल ड्राइव्ह (विशेष मोहीम)- ६४१
कामगार न्यायालये- २१
धनादेश संदर्भातील- ७०२
बँक वसुली- ५१४
एकूण वसूल- २३ कोटी ३१ लाख ५ हजार ६१३ रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87018 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..