रेल्वे छायाचित्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे छायाचित्र प्रदर्शन
रेल्वे छायाचित्र प्रदर्शन

रेल्वे छायाचित्र प्रदर्शन

sakal_logo
By

४३१४१

स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्याला उजाळा
---
रेल्वेस्थानकावर प्रदर्शन; खासदार महाडिक यांच्या हस्ते उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, शाहू महाराज टर्मिनस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसंग्राम या विषयावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे आज उद्‍घाटन झाले. १५ ऑॅगस्टपर्यंत येथील रेल्वेस्थानकावर प्रदर्शन सुरू राहणार आहे.
स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक, राष्‍ट्रपुरुषांची छायाचित्रे व माहिती प्रदर्शनात आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील घटना-घडामोडींचे संदर्भ समजून घेता यावेत, यातून स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनाही समजून घेता येतील, त्यादृष्टीने प्रदर्शन महत्त्वाचे आहे, असे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.
सायबर महाविद्यालय तसेच देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रदर्शनाच्या उद्‍घाटन सत्रासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी, प्रचार अधिकारी महेश चोपडे आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रदर्शनात
१७५७ ची प्लासाची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तुर विद्रोह, १८५७ चा उठाव, राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांची छायाचित्रे, राष्‍ट्रपुरुषांची माहिती, स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आदी संदर्भ या प्रदर्शनात मांडले आहेत. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, खिलापत चळवळ, बार्डोली सत्याग्रह, चितगाव शस्त्रागार, सविनय कायदेभंग, संस्थान विलीनीकरण, संविधान सभा आदी महत्त्वपूर्ण विषयांची दुर्मिळ छायाचित्रेही प्रदर्शनात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87030 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..