खचलेल्या ‘करूळ’ची पुर्नबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खचलेल्या ‘करूळ’ची पुर्नबांधणी
खचलेल्या ‘करूळ’ची पुर्नबांधणी

खचलेल्या ‘करूळ’ची पुर्नबांधणी

sakal_logo
By

43102
करूळ ः खचलेल्या करूळ घाट रस्ता पुनर्बांधणीच्या कामाला आजपासून झालेली सुरूवात.
43101
भुईबावडा ः घाटात दरड हटविण्याच्या कामात व्यस्त यंत्रणा.

करूळ घाट रस्त्याची पुनर्बांधणी
गणेश चतुर्थीपूर्वी काम; खचलेल्या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभारणार
सकाळ वृत्तसेवा
असळज , ता. १३ ः खचलेल्या करूळ घाट रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजपासून सुरुवात केली असून खचलेल्या ठिकाणी कॉंक्रिटची भिंत उभारण्यात येणार आहे. २५ तारखेपर्यंत काम पूर्ण करून गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरळीत करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. सध्या अवजड वाहतूक वगळून इतर वाहतूक सुरू आहे.
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाट रस्ता खचला. परिणामी मार्गावरील वाहतूक बंद केली होती. या मार्गावरील अवजड वाहतूक फोंडाघाट, तर इतर वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविली होती. रस्ता खचल्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी रस्त्यांची पाहणी केली. खचलेल्या रस्त्यांचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. वरिष्ठांनी खचलेल्या ठिकाणी कॉंक्रिटची भिंत उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेले चार-पाच दिवस प्राथमिक जुळवाजुळव केल्यानंतर आज सकाळपासून पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. सध्या खोदाईचे काम सुरू असून एक-दोन दिवसांत प्रत्यक्षात काँक्रिटच्या कामाला सुरूवात होणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे दहा-बारा दिवस लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.

भुईबावडातून एकेरी वाहतूक
भुईबावडा घाटात शुक्रवारी दरड कोसळली होती. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने काल दरड हटविण्यास सुरुवात केली. पाऊस आणि धुके यामुळे सायंकाळी दरड हटविण्याचे काम थांबविले होते. आज पहाटेपासून पुन्हा काम सुरू झाले. आज सायंकाळी सहाला या घाटमार्गाने एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले.

कोट
खचलेल्या करूळ घाट रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरूवात केली आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून एक-दोन दिवसांत कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे. साधारणपणे २५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, महामार्ग प्राधिकरण.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87037 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..