आवश्यक- आरडी बर्मन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- आरडी बर्मन
आवश्यक- आरडी बर्मन

आवश्यक- आरडी बर्मन

sakal_logo
By

46428

वारणा बालवाद्यवृंद सादर
करणार ‘यादे आरडी बर्मन’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः पंचमदा म्हणजे आर. डी. बर्मन. त्यांनी दिलेल्या शैलीदार संगीताची भारतीयांना पडलेली भुरळ आजही कायम आहे. त्यांच्याच गीतांची अनोखी पर्वणी मंगळवारी (ता. १६) मिळणार आहे. वारणा बालवाद्यवृंद ‘यादे आरडी बर्मन'' हा कार्यक्रम सादर करणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी चारला हा कार्यक्रम होईल.
वारणा बाल वाद्यवृंदाची स्वतःची अशी एक खास ओळख संगीत रसिकांमध्ये आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे, किशोरी अमोणकर, लता मंगेशकर, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, नानासाहेब धर्माधिकारी यांनी या वाद्यवृंदाचे कौतुक केले आहे. वारणा परिसरातील किशोरवयीन कलाकार हे सर्वच कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गझल गायक, सिने संगीतकार विजय पाठक आणि त्यांचे सहकारी संतोष सुतार, श्रीलेखा तासगावकर यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. व्यवस्थापक प्रा. जीवनकुमार शिंदे यांच्या सहकार्यातून विविध वाद्यांचा खास पंचम स्टाईल प्रयोग अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87067 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..