इचल ःअमृतमहोत्सवी वर्ष व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ःअमृतमहोत्सवी वर्ष व्याख्यान
इचल ःअमृतमहोत्सवी वर्ष व्याख्यान

इचल ःअमृतमहोत्सवी वर्ष व्याख्यान

sakal_logo
By

43199
-------------
कन्या महाविद्यालयात व्याख्यान
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ‘स्वतंत्र आणि संविधान’ या विषयावर सुनील स्वामी यांचे व्याख्यान झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित व्याख्यानात श्री. स्वामी यांनी संविधानाची महती सांगणारा पोवाडा सादर केला. भारताच्या स्वतंत्र चळवळीतील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानापासून सद्य परिस्थितीपर्यंतच्या स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर परिस्थितीबद्दलचे विचार त्यांनी व्यक्त केले. प्राचार्या डॉ. त्रिशला कदम अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. धीरज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वर्षा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विठ्ठल नाईक यांनी आभार मानले.
- - - - -
७५ फूट ध्वजस्तंभावर ध्वजवंदन
इचलकरंजी : खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात उभारलेल्या ७५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गोविंदराव हायस्कूलमधील ‘एनसीसी’च्या कॅडेट्‍स व ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली. याच परिसरात उभारलेल्या भारतमातेच्या मूर्तीचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी केले. मंदिराचे अध्यक्ष दिलीप शेंडे यांनी स्वागत केले. माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, प्रकाश दत्तवाडे, द्राक्षायणी पाटील, बाळासाहेब कलागते, दीपश्री शेंडे, प्रकाश रावळ, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार आदी उपस्थित होते.
- - - - - - - - -
महाआरोग्य शिबिरास प्रतिसाद
इचलकरंजी : स्वाभिमानी युवक संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर झाले. शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या पुढाकाराने शिबिर झाले. नारायणी हॉस्पिटलच्या सहकार्याने अत्याधुनिक मशिनद्वारे मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. मोफत ईसीजी व शुगर तपासणी करण्यात आली. शिबिरास माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. बसगोंडा बिरादार, सतीश मगदूम, महमद मुजावर, राजू निर्मळे, हेमंत वणकुंद्रे, राजू शेख, विकास चौगुले, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87101 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..