अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे
अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे

अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे

sakal_logo
By

43201
दत्तात्रय बरगे, बाळासाहेब हिरेमठ

अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बरगे यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब हिरेमठ यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक ए. व्ही. गराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या.
बरगे यांचे अध्यक्षपदासाठी नाव जगदीश पट्टणशेट्टी यांनी सुचविले. त्यास सतीश पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी हिरेमठ यांचे नाव नीळकंठ हिरेमठ यांनी सुचविले. त्यास शारदा आजरी यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी एक-एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. मावळते अध्यक्ष बाळासाहेब घुगरे, ज्येष्ठ संचालक विश्‍वनाथ पाटील, सतीश पाटील, राजेंद्र तारळे यांची भाषणे झाली. बरगे यांनी वयाच्या ८० व्या वर्षी बँकेची जबाबदारी दिली आहे. ती पेलताना बँकेला प्रगतिपथावर नेऊ, अशी ग्वाही दिली.
राजशेखर दड्डी, काशीनाथ गुगरे, जितेंद्र नाईक, सुरेश कोळकी, रामदास कुराडे, राजशेखर यरटे, नागाप्पा कोल्हापुरे, गणपतराव डोंगरे, युवराज बरगे, सोमगोंडा आरबोळे, शैलेश पाटील, लक्ष्मण शिंदे, अजित बंदी, राहुल शिरकोळे, दीपक पाटील, आप्पासाहेब पाटील, दिलीप माने, सुभाष हजारे, संग्राम पाटील, वीरपाक्ष पाटणे उपस्थित होते. सरव्यवस्थापक सुनील बावन्नावर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87102 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..