टोमॅटोवर करपा रोगाचे थैमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटोवर करपा रोगाचे थैमान
टोमॅटोवर करपा रोगाचे थैमान

टोमॅटोवर करपा रोगाचे थैमान

sakal_logo
By

43236
-----------------------
टोमॅटोवर करपा रोगाचे थैमान
शेतकऱ्यांचे नुकसान; तीनवेळा कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात नाही

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ : सततच्या पावसामुळे टोमॅटोला धोका निर्माण झाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. टोमॅटोवर करप्‍या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडे जळून जात आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टोमॅटोवर तीन तीन वेळा कीटकनाशक औषध फवारणी करूनही करपा रोग आटोक्यात येत नाही. बाजारभाव नसल्याने आधीच उत्पादन खर्चही निघत नसताना त्यातच फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे.
काही दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या ऊन पावसाचा खेळ आणि पावसाची अनियमितता टोमॅटोला धोका पोहचवत आहे. टोमॅटोवर मागील काही दिवसांपासून करपा रोग पडल्यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. मात्र आता या रोगाचा प्रसार अतिशय जलद होत असल्यामुळे शहर व परिसरातील टोमॅटो पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी औषध फवारणी करूनही करपा आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संततधार पावसामुळे पीक वाचवण्यासाठी शेतकरी अत्यंत महागड्या किमतीच्या औषधांची खरेदी करून पिकांवर फवारणी करत आहेत. परंतु पाऊस कधी कमी तर कधी जास्त या समीकरणांमुळे जी महागडी पावडर मारली जाते. ती पाण्याने धुऊन जात असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. शेतात वाहने जात नसल्यामुळे सर्व कामे बळीराजा स्वतःच्या ताकदीच्या आधारे करीत आहे. काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यातच फवारणीमुळे शेतकऱ्याला झळ बसत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मिळेल त्या ठिकाणाहून टोमॅटोची रोपे उपलब्ध करून टोमॅटो लागवड शेतकऱ्यांनी केली. अत्यंत महागडे बियाणे, औषधे फवारणी करीत टोमॅटो पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट घेतले. कमी दिवसांत जादा भांडवल मिळवून देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते. मात्र आता भरपूर भांडवल खर्च करून टोमॅटो पीक वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत.
- - - - - - - -
उत्पादनाच्या उंबरठ्यावर हवालदिल
तालुक्यात टोमॅटोवर करपा रोग पडल्याने उत्पादनाच्या उंबरठ्यावर असलेले टोमॅटो पीक संकटात सापडले आहे. ऑगस्टच्या मध्यापासून तालुक्यातील टोमॅटोची खऱ्या अर्थाने राज्यात व राज्याबाहेर विक्री सुरू होते. मात्र गेल्या श्रावणसरींसह जोरदार पाऊस व याबरोबर उष्ण दमट वातावरण यामुळे टोमॅटो पीक करपा रोगाला बळी पडले आहे. करपामुळे टोमॅटो पिकाच्या पाने, फांद्या व फळांवर काळे ठिपके पडल्याने पीक वाया जात आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
- - - - - - - - -
सध्या टोमॅटो पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पिकावर करपा, बुरशी, फुलकळी कुजण्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टोमॅटो पिकाला उत्पन्न वाढीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. उमेदीने केलेल्या टोमॅटो लागवडीवर यंदा संकट आले.
-भगतसिंग गायकवाड, टोमॅटो उत्पादक शेतकरी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87136 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..