कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आझाद गौरव झेंडा यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आझाद गौरव झेंडा यात्रा
कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आझाद गौरव झेंडा यात्रा

कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आझाद गौरव झेंडा यात्रा

sakal_logo
By

43280

कॉंग्रेसतर्फे आझाद गौरव झेंडा यात्रा
कोल्हापूर, ता. 14 : भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या कॉंग्रेसचा विजय असो असा जयघोष करत कोल्हापूर जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीने आझाद गौरव झेंडा यात्रा काढली. शहरातील पेटाळा मैदान ते महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक मार्गे दसरा चौक ही रॅली काढली.
स्वातंत्रप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ही यात्रा काढली. पेटाळा मैदान येथून यात्रेला सुरुवात केली. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमध्ये महात्मा गांधी यांचे पोस्टर उभे केले होते. ट्रॉलीमध्ये हिंदु, मुस्लिम, पंजाबी, शिख यासह इतर जाती-धर्मातील वेश परिधान करुन असणाऱ्या मुला-मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी फुगे, मफलर आणि डोक्‍यावर पाणी टोपी घालून शहरातून रॅली काढली. रॅलीमुळे महाद्वाररोडला मिळणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. रॅली पुढे जाईल, त्या-त्या ठिकाणचा रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी मोकळा करुन वाहतूक पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, दसरा चौक येथे राष्ट्रगीत झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली. यावेळी, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋृतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, मधुरिमाराजे छत्रपती, माजी महापौर निलोफर आजरेकर, सचिन चव्हाण, सारंगधर देशमुख, सत्यजित जाधव, जितू सलगर, तौफिक मुल्लाणी, संजय पवार-वाईकर आदी उपस्थित होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे रिक्षावरती लावलेले फलक लक्षवेधी ठरले. विविध शाळा व महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसच्‍या विद्यार्थांनी रॅलीत सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87144 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..