फाळणीचा दिवस विसरता येत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाळणीचा दिवस विसरता येत नाही
फाळणीचा दिवस विसरता येत नाही

फाळणीचा दिवस विसरता येत नाही

sakal_logo
By

43254

फाळणीचा दिवस विसरता येत नाही
जिल्हाधिकारी रेखावार; फाळणीस्मृती दिन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

कोल्हापूर, ता. १४  : देशाची फाळणी दुःखद घटना आहे, ही घटना कधीही विसरली जाणार नाही, दोष आणि हिंसेमुळे लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले व हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले, हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहोत. स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी होत असताना भारताने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. १४ ऑगस्ट फाळणीस्मृती दिनावर अधारित छायाचित्र प्रदर्शन शाहू स्मारक भवन येथे आयोजित केले आहे; त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ‘‘फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले होते. जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरापैकी एक होते. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी नागरिकांत आनंद होता. फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात असे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. दोन्ही बाजूंनी हिंसा झाली यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दिवासाची आठवण म्हणून हा दिवस विभाजन विभिषिका स्मृतीदिवस म्हणून साजरा केला जातो.’’
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याची फाळणी झाली. या फाळणीला ब्रिटिश जबाबदार आहेत. हिंदू आणि मुस्लिम यांचे दोन गट तयार झाले त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना बसला. फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. या सर्व घटना विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत. प्रदर्शनाला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.’’  
यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे, गट विकास अधिकारी जयवंत उगले, सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगरचे अध्यक्ष गुवालदास कट्टार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87160 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..