पावसाचा जोर कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा जोर कमी
पावसाचा जोर कमी

पावसाचा जोर कमी

sakal_logo
By

पावसाचा जोर ओसरला
--
पंचगंगेची पाणी पातळी होतेय कमी : ६८ बंधारे पाण्याखालीच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आजही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. राधानगरी धरणातून १६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, ६८ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री उशिरापर्यंत दीड ते दोन फुटाने कमी झाली आहे. शनिवारी रात्री १२ ला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४१ फूट ७ इंच होती. आज दुपारी २ वाजता ४० फूट ७ इंच म्हणजे एक फुटाने पाणी पातळी कमी झाली.

बावडा-शिये रस्ता
वाहतुकीस खुला
पुराचे पाणी आल्याने पुणे-बेळगाव महामार्गाला जोडणार आणि रहदारीचा असणारा कसबा बावडा-शिये रस्ता बंद होता. आज पुराचे पाणी कमी झाल्यामुळे हा रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरू झाला आहे.

जिल्ह्यात २४ तासांत झालेला पाऊस -
*हातकणंगले- २.२ मिमी, *शिरोळ -१.१ मिमी, *पन्हाळा- १०.४ मिमी, *शाहूवाडी- २४ मिमी, *राधानगरी- ६.५ मिमी, *गगनबावडा- २१.८ मिमी, *करवीर- ४.१ मिमी, *कागल- ३.४ मिमी, *गडहिंग्लज- ३.२ मिमी, *भुदरगड- १२.२ मिमी, *आजरा- १३.५ मिमी, *चंदगड- १८.६ मिमी असा एकूण ८.५ मिमी.
.......

धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये :
*धरण* एकूण पाणीसाठवणूक क्षमता* आजचा पाणीसाठा* टक्केवारी
*राधानगरी*८.३६*८*९६
*दुधगंगा*२५.३९*२२.५८*८९
*वारणा*३४.३०*३०.९७*९०
*तुळशी *३.४०*३.३३*९०
*अलमट्टी

६८ बंधारे पाण्याखाली
*पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,
*भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव, तारळे व खडक कोगे,
*कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सातवे सावर्डे, शिरगाव, सरुड पाटणे व कोपार्डे, *वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगाव व शेळोली
* वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, खोची, मांगले-सावर्डे, चावरे व दानोळी,
*दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे
*कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, *तुळशी नदीवरील- बीड, आरे, व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे *धामणी नदीवरील- सुळे *हिरण्यकेशी नदीवरील- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी असे ६८ बंधारे पाण्याखाली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87173 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..