राघवेंद्र स्वामी महारथोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राघवेंद्र स्वामी महारथोत्सव
राघवेंद्र स्वामी महारथोत्सव

राघवेंद्र स्वामी महारथोत्सव

sakal_logo
By

‘गोविंदा... गोविंदा’च्या गजरात
राघवेंद्र स्वामींचा महारथोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः राघवेंद्र स्वामी यांचा ३५१ वा आराधना महोत्सवात आज ‘गोविंदा... गोविंदा’ च्या गजरात महारथोत्सव झाला. निपुण कोरे यांच्या हस्ते पूजा झाली. हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम्‌च्या घोषणा, गोविंदा... गोविंदाचा गजर करत महाद्वार रोड, जोतिबा रोड, सरलष्कर भवन, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे रथोत्सव काढण्यात आला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राघवेंद्र स्वामी यांच्या ३५१ व्या आराधना महोत्सवाची आज सांगता झाली. त्यासोबतच आज पर्णू आराधनाही भक्तिपूर्ण वातावरणात झाली. रथोत्सव झाल्यानंतर जगाचे कल्याण व्हावे यासाठी श्रेय प्रार्थना झाली. राधिका भजनी मंडळ, श्रीनिधी भजनी मंडळ व परिमला भजनी मंडळांनी कीर्तन सादर केले. महोत्सवाचे व्यवस्थापन के. रामाराव, पी. ए. जोशी आणि राघवेंद्र स्वामी भक्त मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87225 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..