ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास आवश्‍यक. कांचनताई परुळेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास आवश्‍यक. कांचनताई परुळेकर
ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास आवश्‍यक. कांचनताई परुळेकर

ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास आवश्‍यक. कांचनताई परुळेकर

sakal_logo
By

43317
खेडे (ता. आजरा) : येथील कार्यक्रमात बोलताना स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकर. या वेळी डॉ. अनिल देशपांडे, डॉ. अंजली देशपांडे, सौम्या तिरोडकर, डॉ. संदीप देशपांडे व अन्य मान्यवर.

ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास आवश्‍यक
कांचनताई परुळेकर; खेडेत ग्रामीण शाश्‍वत योजनेतंर्गत मार्गदर्शन शिबिर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ : ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास करणे, ही काळाची गरज बनली आहे. यासाठी खेडेगावात विविध उपक्रम राबवावे लागतील, असे प्रतिपादन स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकर यांनी केला. (कै.) माधवराव देशपांडे (भाऊ) यांचे कुटुंबीय व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे ग्रामीण शाश्‍वत विकासाअंतर्गत खेडे (ता. आजरा) या गावाची निवड केली आहे. यानिमित्त खेडे येथे शिबिर झाले. दि. आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, डॉ. अंजली देशपांडे, डॉ. संदीप देशपांडे, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर प्रमुख उपस्थित होत्या.
ज्योती सावरतकर यांनी स्वागत केले. कांचनताई परुळेकर यांनी संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विविध उद्योग करण्याची गरज आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षण व त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. युवक युवतीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. गांडूळ खत, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेतली जातील.’’ डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर यांनी स्वंयसिद्धा व फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून महिला दहा हजारांपासून दीड लाखापर्यंत अर्थार्जन करीत आहेत. खेडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. सुतार यांनी चिक्की व पॉपकॉर्ननिर्मितीची प्रात्यक्षिके दाखवली. सर्व ग्रामस्थांना बियाणे पाकिटांचे वितरण केले. या वेळी माजी सरपंच प्रकाश देशपांडे, स्नेहल स्नेहल करंडे, मिनल होळणकर, नवदुर्गा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. साधना चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87239 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..