कोल्हापूर चे आणखीन १० जण आयर्नमॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर चे आणखीन १० जण आयर्नमॅन
कोल्हापूर चे आणखीन १० जण आयर्नमॅन

कोल्हापूर चे आणखीन १० जण आयर्नमॅन

sakal_logo
By

43321
कोल्हापूर : कझाकिस्तान येथील आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी झालेला कोल्हापूरचा चमू.

कोल्हापूरचे आणखी १३जण आयर्नमॅन
---
कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा; १८ जणांचा सहभाग
कोल्हापूर, ता. १४ : कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. त्यामुळे आयर्नमॅन नागरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी १३ जणांची भर पडली. या स्पर्धेत कोल्हापूरमधील १८ जण सहभागी झाले होते. या स्पर्धेत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग व ४२.२ किलोमीटर धावणे हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात. या स्पर्धेत कोल्हापूरचे पंकज रवळु, मंगेश चव्हाण, मुकेश टोटला, शैलेश टोटला, संजय सूर्यवंशी, यशवंत गुरव, भारतवीरसिंह देवरा, अतुल पाटील, नीलेश व्यवहारे, मेघ शिवालकर, मयुरा शिवालकर, ओम कोरगावकर व अशोक चौगुले या स्पर्धकांचा समावेश होता.
स्पर्धेतील यशासाठी तीन वर्षांपासून सराव सुरू होता. विविध भौगोलिक परिस्थिती व वातावरणात सराव केला होता. स्पर्धकांना अर्हता टीमचे कोच पंकज रवळू व आशीष रवळू यांचे मार्गदर्शन लाभले. पंकज रवळू हे आयर्नमॅन युनिव्हर्सिटीचे सर्टिफाईड कोच असून, त्यांनी ३५ हून अधिक आयर्नमॅन घडविले आहेत. पुढील आठवड्यात कोपेनहेगन येथे ही स्पर्धा होणार असून, कोल्हापूरमधून कुमार ब्रिजवानी व प्रकाश मोरे हे रवाना झाले आहेत.

चौकट
पंकज रवळु द्वितीय
पंकज रवळू यांनी ही शर्यत १० तास सात मिनिटे ५३ सेकंदांत पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकवला व फास्टेस्ट इंडियन आयर्नमॅन हा रेकॉर्ड केला. स्वत: प्रशिक्षक असलेले रवळु बंधु जिल्ह्याबाहेरील खेळाडूंनाही मार्गदर्शन करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87243 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..