तडजोडीने पावणेदोन कोटी वसुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तडजोडीने पावणेदोन कोटी वसुल
तडजोडीने पावणेदोन कोटी वसुल

तडजोडीने पावणेदोन कोटी वसुल

sakal_logo
By

तडजोडीने पावणेदोन कोटी वसूल
---
गडहिंग्लजला लोकअदालत; ५४७ प्रकरणे निघाली निकाली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : येथील तालुका विधी सेवा समितीतर्फे लोकअदालत झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकअदालतीत ५४७ दाखल पूर्व, दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघाली. एक कोटी ८४ लाख ७२ हजार ७५८ रुपये तडजोडीने वसूल करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायालयात ही लोकअदालत झाली.
लोकअदालतीसाठी पाच पॅनेल तयार केले होते. जिल्हा न्यायाधीश-१ ओंकार देशमुख यांच्या पॅनेलमध्ये १९ प्रकरणे, जिल्हा न्यायाधीश-२ ए. आर. उबाळे यांच्या पॅनेलमध्ये १३ प्रकरणे, दिवाणी न्यायाधीश जी. व्ही. देशपांडे यांच्या पॅनेलमध्ये दाखलपूर्व ४८० प्रकरणे, सहदिवाणी न्यायाधीश एम. टी. खराडे यांच्या पॅनेलमध्ये २०, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. राठोड यांच्या पॅनेलमध्ये १६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीमुळे अतिरिक्त जिल्हा न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.
पॅनेल अॅडव्होकेट शीतल साळवी, अॅड. आशा घाटगे, अॅड. विद्या मुसंडी, अॅड. भारती शिंदे, अॅड. वर्षा धुंदरे, सहायक अधीक्षक संजय साळुंखे, ए. ए. पाटील, सुधा तांबवेकर, अस्मिता डांगे, दीपक चौगुले, आर. डी. पाटील, एस. आर. कांबळे, रवींद्र घायतडक, आनंदा वणिरे, प्रदीप पाटील, एस. एस. उंडाळे, प्रदीप चौगुले, सचिन पाटील, पी. जी. मेटकुप्पी, शीतल केर्लीकर, बी. एन. कांबळे, भास्कर पाटील, सागर मानकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
--------------------
चौकट...
ग्रामपंचायत कराची वसुली...
ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा थकबाकीदारांना ग्रामपंचायतींकडून नोटीस काढण्यात आली होती. लोकअदालतीत ११ लाख २० हजार ६८८ रुपये करवसुली झाली. ३३२ थकबाकीदारांनी लोकअदालतीत कराचा भरणा केला. चन्नेकुपी गावातून सर्वाधिक एक लाख ३० हजार ९९० रुपये कराची वसुली झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87332 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..