सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे विवेकानंद विद्यालयात उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे विवेकानंद विद्यालयात उद्‍घाटन
सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे विवेकानंद विद्यालयात उद्‍घाटन

सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे विवेकानंद विद्यालयात उद्‍घाटन

sakal_logo
By

kwd161
कोवाड : गुडेवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विद्यार्थीनिर्मित सेंद्रिय खत उपक्रमाचे उद्‌घाटन करताना विक्रम पाटील व मान्यवर.

सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे
विवेकानंद विद्यालयात उद्‍घाटन
कोवाड, ता. १६ : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाचे उद्‍घाटन बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांत ‘हम सब बच्चे, आत्मनिर्भर भारत के’ हा ज्ञानवाद रुजावा, या उद्देशाने विद्यालयात सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम राबविला होता. विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. शाळेच्या आवारात सुकलेला पालापाचोळा व शेण एकत्र करून त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती केल्याचे मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे यांनी सांगितले. तयार केलेल्या खतपिशव्यांचे उद्‍घाटन सचिव प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावरील असला तरी तो समाजाला दिशा देणारा असल्याचे सांगून पाटील यांनी मार्गदर्शक शिक्षक एल. पी. पाटील यांचे अभिनंदन केले. खताच्या एक व दोन किलोच्या पिशव्या तयार करून विद्यार्थी त्यांची विक्री करणार असल्याचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून सतत नवीन उपक्रम राबविले जात असल्याचे समाधान निंगाप्पा आवडण यांनी व्यक्त केले. या वेळी धनाजी नाईक, सानिका पाटील या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय खत निर्मितीचा अनुभव कथन केला. एस. बी. पाटील, यू. एस. कपिलेश्‍वरी, एस. के. गावडे, प्रकाश नाईक, पुंडलिक पाटील, शशिकांत गावडे उपस्थित होते. एल. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87346 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..