गडहिंग्लजला स्वातंत्र्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला स्वातंत्र्यदिन उत्साहात
गडहिंग्लजला स्वातंत्र्यदिन उत्साहात

गडहिंग्लजला स्वातंत्र्यदिन उत्साहात

sakal_logo
By

43533
गडहिंग्लज : नगरपालिकेसमोर ध्वजारोहनानंतर मानवंदना देताना मुख्याधिकारी स्वरुप खारगे व विभाग प्रमुख, कर्मचारी.
------------
43534
गडहिंग्लज : पंचायत समितीसमोर ध्वजारोहन करताना गटविकास अधिकारी शरद मगर.
---------------------------
43535
गडहिंग्लज : मित्रांगण परिवारातर्फे झालेल्या कार्यक्रमात आक्काताई काळे यांचा सत्कार करताना बाबासाहेब वाघमोडे. शेजारी नागेश चौगुले, सुनील चौगुले, संतोष चिक्कोडे, धोंडिबा हळदकर, दत्तात्रय बरगे, सदानंद वाली आदी.

गडहिंग्लजला स्वातंत्र्यदिन उत्साहात
ध्वजारोहन : शहरातून तिरंगा रॅली, माजी सैनिक-विधवांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : शहरासह परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयासह शासकीय कार्यालये, सहकारी, सामाजिक संस्थांत ध्वजवंदन करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मशाल ज्योत, तर मुस्लिम समाजातर्फे तिरंगा रॅली निघाली. ध्वजवंदनाचा मान माजी सैनिक, विधवांना देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
येथील पोलिस परेड मैदानावर शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरुप खारगे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके आदी उपस्थित होते. पंचायत समितीत गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तर नगरपालिकेत मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. या वेळी विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

गडहिंग्लज हायस्कूल
प्राचार्य पी. टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एनसीसी कॅडेट व आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. माजी सैनिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

ओंकार महाविद्यालय
संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, प्रा. स्वंयप्रभा सरमगदूम, राधिका पेडणेकर, संचालक विठ्ठल भमान्नगोळ, उध्दव इंगवले, खुदोजी साळोखे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय
सागर पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शरण्या गावडे हिने भाषण केले. मुख्याध्यापक कृष्णा घाटगे यांनी रोख बक्षीस दिले. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा राणी शिंगे, प्रकाश म्हेत्री, सुधाकर धनवडे, गौरेश सुतार, किरण येसरे, शिवाजी पाटील, श्रीकांत गडकरी, विलास गाताडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

क्रिएटीव्ह हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय
संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तनिक्षा पाटील, तन्वी सावंत, श्रेयस सावंत यांची भाषणे झाली. डॉ. देसाई यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मांडला. सचिव अण्णासाहेब बेळगुद्री, उपाध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, मुख्याध्यापक दिनकर रायकर, डॉ. नीता पाटील उपस्थित होते.

किलबिल विद्या मंदिर
पर्यवेक्षक राहूल शेट्टी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. इयत्ता सहावी व दहावीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, डॉ. सरस्वती हत्ती, दयानंद हत्ती, शहजादी पटेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

बॅ. नाथ पै विद्यालय
प्रभारी वनपाल रणजित पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची पुजा वनरक्षक सुनील भंडारे यांच्या हस्ते झाली. पाटील यांनी शाळेला वॉटर प्युरिफायर भेट दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित कांबळे, उपाध्यक्षा पुजा माने, उपमुख्याध्यापक विष्णू बेनके यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

चैतन्य अपंगमती विकास विद्यालय
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात सरपंच बसवराज हिरेमठ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शंकर कोरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले. दहावीतील गुणवंत विद्यार्थी दीपाली दरेकर, सविता मोर्ती, लक्ष्मी कांबळे, सुजाता पाटील, ज्योती रेगडे यांचा सत्कार झाला. ग्रामसेवक राजाराम घेवडे, तलाठी प्रल्हाद खटावकर, राजू खमलेट्टी, शंकर कोरी, कलगोंडा पाटील, साताप्पा कांबळे, मुख्याध्यापिका अरुणा कांबळे उपस्थित होते.

केंद्र शाळा हिडदुगी
हिडदुगी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्र शाळेत दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या मनाली रेडेकर हिच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सरपंच जितेंद्र रेडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे, मुख्याध्यापक विकास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव सुतार, आरोग्य सेविका रिया साळुंखे, ज्योती घेवडे, प्रभाकर राजगोळे, दयानंद खतकर, मंगल पाटणे, कविता रेडेकर, प्रभाकर राजगोळे उपस्थित होते.

मराठी मंदिर कनिष्ठ महाविद्यालय
मराठा मंदिर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅन्ड कॉमर्समध्ये शांता रेडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्राचार्या सरिता भुईंबर, प्रा. नेहा पाटील, प्रा. पल्लवी कुंभार, प्रा. सानिका कुलकर्णी, प्रा. नंदा वसगडेकर, पुजा गवळी उपस्थित होते.

रवळनाथ हौसिंग सोसायटी
रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी, ज्ञानदीप प्रबोधिनी, इंटेंट करिअर अॅकॅडमीत संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एनसीसी कॅडेट मानस शेरवी याने ध्वजसंचलन केले. स्नेहा गुरव, मिनल मजती, डॉ. दत्ता पाटील, चौगुले यांची भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव, डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. विजय आरबोळे, महेश मजती, डॉ. संजय चौगुले, एस. एन. देसाई, मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, बसाप्पा आरबोळे, प्रभाकर द्राक्षे, चंद्रकांत पत्की, संदीप कागवाडे उपस्थित होते. सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक शिवानंद घुगरे यांनी आभार मानले.

डॉ. घाळी महाविद्यालय
संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एनसीसी कॅडेटनी संचलन करुन मानवंदना दिली. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संचालक शिवकुमार कोल्हापुरे, किशोर हंजी, महेश घाळी, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्राचार्य विजय चौगुले आदी उपस्थित होते.

शिवराज महाविद्यालय
संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस यांची प्रमुख उपस्थिती होती. ऋतुजा तोरस्कर यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी एनसीसी कॅडेटना प्रतिज्ञा दिली. वीरपत्नी सुगंधा भिकले यांचा सन्मान झाला. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सागर दांगट यांच्या हस्ते अथिलेश शिंदे, आकाश मोरबाळे, श्रीहरी सबनीस या एनसीसी कॅडेटचा सत्कार झाला. सौरभ पाटील याचाही विशेष सत्कार झाला. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष के. जी. पाटील, जे. वाय. बारदेस्कर, अॅड. दिग्विजय कुराडे, के. व्ही. पेडणेकर, बसवराज आजरी, शंकरराव नंदनवाडे उपस्थित होते.

निवासी मुकबधीर विद्यालय
वैजनाथ मिल्क अॅण्ड अॅग्रोप्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष रवींद्र घोरपडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अमर चोथे यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. कृष्णा पोवार यांनी शैक्षणिक साहित्याचे तर शकिल मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना दूधाचे वितरण केले. संस्थापक अध्यक्ष हणुमंत साठे, मुख्याध्यापिका गौराबाई साठे, रामगोडा पाटील, मारुती चोथे, अमोल पाटील, संभाजी सुतार, विकास साठे, अनिकेत घोरपडे, वनश्री घोरपडे आदी उपस्थित होते.

ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज, रचना पब्लिक स्कूलमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. रचना स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादर केले. महेश कोरी, प्राचार्य ए. एस. शेळके, मुख्याध्यापक एस. ए. किल्लेदार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

साई एज्युकेशन सोसायटी
गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्याशाखांत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन झाले. साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेजर लेफ्टनंट (निवृत्त) विश्‍वनाथ घोटणे, मुकबधीर निवासी शाळेत माजी सैनिक संजय शिंदे, साई अद्यापक विद्यालयात माजी सरपंच ए. आर. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. अध्यक्ष सतीश पाटील, प्रा. तानाजी गायकवाड, डॉ. दीपाली कोरडे, मुख्याध्यापिका सरिता रजपूत, प्रकाश कांबळे, प्रवीण मुदाळकर, रमेश पाटील, अलिखान पठाण, एन. आर. दळवी, बशीर म्हाबर, डॉ. नागोजी चव्हाण, शांतीनाथ पाटील, आर. बी. कांबळे, शिवलाल पुजारी, ज्ञानेश्वर गुजर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येथील कडगाव मार्गावरील कार्यालयासमोर माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कार्यालयापासून मशाल रॅलीला सुरवात झाली. मुख्य मार्गावरुन फिरुन रॅली महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आली. या ठिकाणी सांगता करण्यात आली. शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, वसंतराव यमगेकर, रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, महेश सलवादे, राजू पाटील, रश्मिराज देसाई, अमर मांगले, महिला शहराध्यक्षा शर्मिली पोतदार, मंजुषा कदम, उर्मिला जोशी, रेश्मा कांबळे, अरुणा कोलते, गीता पाटील, पुनम म्हेत्री उपस्थित होते.

ई. बी. गडकरी महाविद्यालय
डॉ. ए. एस. देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे अध्यक्ष सागर गडकरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामपंचायत शिप्पूर
शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच गीतांजली राशिवडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, आजी-माजी सैनिक, साहित्य-शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा विशेष सत्कार झाला. उपसरपंच जितेंद्र कांबळे, पोलिस पाटील सुलभा पोवार, विनायक शेवाळे, पांडुरंग राशिवडे, सुजाता रायकर, राजश्री कोकितकर, अश्विनी रायकर, सविता शिप्पूरकर, तलाठी चंद्रकांत म्हसवेकर आदी उपस्थित होते.

विद्या मंदिर व सावित्रीबाई हायस्कूल करंबळी
करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले हायस्कूलतर्फे कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ शेरेकर यांनी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. प्रज्ञाशोध व एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अमृता धुमाळ, आदर्श सुतार, संध्या धुमाळ व मार्गदर्शक शिक्षक श्रीनाथ पाटील, श्रावण जाधव, नामदेव पाटील, बाळासाहेब शेरेकर यांचा सत्कार झाला. ग्रामपंचायतीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना शाखा हसुरचंपू
हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील शिवसेना शाखेतर्फे ध्वजवंदन झाले. माजी सैनिक अनिल रेडेकर व सुरेश तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. शाखेचे संघटक संभाजी येरुडकर, शाखाप्रमुख मारुती कमते, उपशाखाप्रमुख शकील मुल्ला, सचिव राजू गोटूरे, युवा सेनेचे कार्यकर्ते महादेव गोटूरे, चंद्रशेखर खवणे, सुरेश शेंडगे, अनिल धामणकर, सुरेश खिचडे, सागर कांबळे, लक्ष्मण कमते, संभाजी शेंडगे, सातू मतकरी, मारुती इंगळे, संतोष फुटाणे यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

महावितरणतर्फे वृक्षारोपण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गडहिंग्लज महावितरणतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. कडगाव मार्गावरील विभागीय कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण झाले. कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. गडहिंग्लज विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आजरा, नेसरी, चंदगड कार्यालयातर्फेही वृक्षारोपण झाले. विविध जातींची प्रत्येकी ७५ रोपे लावण्यात आली. महावितरणचे अधिकारी, अभियंते व जनमित्र उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल कौलगे
कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी सैनिक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. एमसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन झाले. गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. वीरपत्नी मनिषा देसाई, विजय आगलावे, समीर बारदेस्कर यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप झाले. ग्रामपंचायतीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मुस्लिम बांधवातर्फे रॅली
येथील मुस्लिम बांधवातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. सुन्नी जुम्मा मस्जिद येथून सुरवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली फिरली. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. तिरंगी ध्वज घेऊन बांधव रॅलीत सहभागी झाले होते. दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली. प्रा. आशपाक मकानदार, हरुण सय्यद, रेहमान नाईकवाडे, पी. एस. नदाफ, घुडूलाल शेख, अरिफ तांबोळी, मुन्ना सय्यद, घुडूसाहेब मुगळे, फिरोज मणेर, हैदर जमादार, अलताफ शानेदिवान, आशपाक किल्लेदार यांच्यासह मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

मित्रांगण परिवारातर्फे सन्मान सोहळा
येथील मित्रांगण परिवारातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सन्मान सोहळा झाला. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्यसैनिक मारुती काळे यांच्या पत्नी आक्काताई काळे, सामाजिक कार्यकर्ते ताहिर मकानदार, कारगील युद्धात सहभागी झालेले सुबराव पाटील यांचा विशेष सन्मान झाला. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय बरगे यांचा व निवृत्त ऑर्नररी कॅप्टन धोंडीबा हळदकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार झाला. हबीब मकानदार, राजेंद्र भुईंबर, मजिद किल्लेदार, किरण म्हेत्री, फिरोज मणेर, विशाल रोटे, मोहसीन अत्तार, हिदायत नाईकवाडे, भारत खोत, गौरव गच्ची, सुनील कांबळे, सरीता कांबळे, गीता पाटील यांनी परिश्रम घेतले. युवराज बरगे यांनी स्वागत केले. कुमार पाटील यांनी आभार मानले.

एस. एन. कॉलेज
संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. गरीब विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रा. शोभा होडगे, प्राचार्या शुभांगी नाईक, प्रा. शीतल थिटे, प्रा. निळकंठ कोडोली, प्रा. मिल्टन नोरेंज, वर्षाराणी चोथे, पल्लवी भोसले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87492 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..