आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात
आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

sakal_logo
By

आजरा तालुक्यात देशभक्तीला उधाण
आजरा, ता. १६ : आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय. नगरपंचायत, ग्रामपंचायती यासह विविध संस्थामध्ये ध्वजवंदन झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन दिवसात विविध कार्यक्रम झाले. हर घर तिरंगा या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यात प्रभातफेरी, तिरंगा रॅली निघाली. देशभक्तीला उधाण आले होते.
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी निवडणुक नायब तहसीलदार डी. डी. कोळी, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, माजी सैनिक, महसुल कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. आजरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आजरा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा जोस्ना चराटी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, राकेश चौगुले, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. आजरा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आजरा कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आजरा तालुका सूतगिरणीमध्ये अन्नपुर्णादेवी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दि. आजरा अर्बन बॅंकेमध्ये बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. जनता सहकारी बॅंक लि, आजरामध्ये अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये अध्यक्ष जनार्दन टोपले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आजरा ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराज कुपेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आजरा तालुका खरेदी विक्री संघामध्ये संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. येथील पाटबंधारे कार्यालयात शाखाधिकारी श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सुलगाव रोपवाटीकेमधील वनविभागाच्या कार्यालयात आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता आर. एन. सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बालविकास प्रकल्प कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा दिनकर कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये आजरा महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एनसीसी विभागाने परेड संचलन केले. देशभक्तीपर पटनाट्य सादर करण्यात आले. आजरा हायस्कूलमध्ये जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. हवालदार सचिन पाटील, हवालदार अब्दुल वाहित सोनेखान यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. समाजशास्त्र विभागाने तयार केलेली भितीपत्रिका, पोस्टर प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
सोहाळे येथे सरपंच वृषाली कोंडुस्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दोरुगडेवाडी येथील प्राथमिक शाळेत उपसरपंच राजेंद्र दोरुगडे याच्या हस्ते ध्वजवंदन झाले. साळगाव येथे सरपंच पुजा कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. साळगाव शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत माडभगत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देवर्डे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच जी. एम. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गावातील आजी- माजी सैनिकांचा या वेळी गौरव झाला. भादवण येथे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गुणवंत विद्यार्थांचा या वेळी सत्कार झाला. मासेवाडी ग्रामपंचायतीमध्ये नंदा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी सरपंच पांडुरंग तोरगले, प्रा. राहुल पाटील, अॅड. रोहीत पाटील उपस्थित होते. वेळवट्टी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मनिषा देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी ग्रांपचायत सदस्य इंद्रजीत देसाई सदस्य, ग्रामसेवक संदिप चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते.

पेरणोलीत सांस्कृतिक कार्यक्रम
पेरणोली ग्रामपंचायतीमध्ये व पेरणोली हायस्कूलमध्ये सरंपच उषाताई जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पेरणोली प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका जयश्री वरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. रांगोळी, वक्तृत्व व रंगभरण स्पर्धा झाल्या. बळीराजा पतसंस्थेमध्ये उपाध्यक्ष यशंवत धोंडीबा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. केदारलिंग सेवा संस्थेमध्ये अध्यक्ष सर्जेराव देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ग्रामपंचायत इटे येथे सरपंच गीता विष्णु सुतार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.विद्यामंदिर इटे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हुलाजी ईश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

गवसे परिसर
ग्रामपंचायत गवसे व बापुसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे येथे सरपंच सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बापुसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये माजी सैनिक आनंदा शेटगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. केंद्रीय मराठी शाळेत माजी विद्यार्थींनी श्‍वेता पवार, वैष्णवी पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्यसेविका शिल्पा साठे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
----------------------
आजरा नगरपंचायतीची तिरंगा रॅली लक्षवेधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात आजरा नगरपंचायतीतर्फे तिरंगा रॅली झाली. यामध्ये नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, तहसीलदार विकास अहिर, अजिंक्य पाटील, यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ढोल ताशा पथकाचे प्रात्यक्षिक लक्ष वेधणारे होते. आजरा पोलीस ठाण्यामार्फत शहरात मोटारसायकल रॅली झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87509 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..