स्वातंत्र्य दिवस पत्रके एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य दिवस पत्रके एकत्रितपणे
स्वातंत्र्य दिवस पत्रके एकत्रितपणे

स्वातंत्र्य दिवस पत्रके एकत्रितपणे

sakal_logo
By

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील शाळा - महाविद्यालये, संस्था, संघटना, पक्ष कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, प्रभातफेरी, रॅलीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा दिला. ध्वजवंदन, जिलेबी वाटप, सामूहिक राष्ट्रगानातून मनामनांत देशभक्ती संचारली. काही संस्था संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवत स्वातंत्र्य दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.


43445
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन झाले.

शिवाजी विद्यापीठ
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १२५ फुटी तिरंगी ध्वजासह काढलेली फेरी हे स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहिले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. प्रांगणातील छत्रपती शिवराय यांच्या भव्य पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि मान्यवरांच्या नेतृत्वाखाली १२५ फुटी तिरंगा ध्वजासह विद्यापीठ प्रांगणात फेरी काढली. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. एच. ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार, आजीवन अध्ययन विकास केंद्राचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये उपस्थित होते. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाने नियोजन केले.
...
43355
महापालिका
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, नगररचनाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, लेखा अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे आदी उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ घेण्यात आली.
...
43325
कोल्हापूर : कागलकर हाऊस, जिल्हा परिषद जुनी इमारत येथे ध्वजवंदन करताना उपस्थित मान्यवर.

जिल्हा परिषद
निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या वीर पत्नी श्रीमती हेमलता पाटील यांच्या हस्ते कागलकर हाउस, जिल्हा परिषद जुनी इमारत येथे ध्वजवंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. थोर समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे पणतू कॅप्टन विकास गोखले यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन केले. श्री. चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांचा साडी, शाल, रोप, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे पुस्तक देऊन सत्कार केला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या अनुषंगाने विभाजन विभिषिका दिन म्हणून पाळण्यात आला. फाळणीच्या शोकांतिका दर्शविणाऱ्या भित्तिचित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने केले. जिल्हा परिषदेकडील कलामंचच्या अधीक्षक सचिन मगर, कलाकारांनी ‘मेरे देश की धरती’ हे देशभक्तिपर गीत सादर केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अशोक धोंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील, सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
-
‘गोकुळ’ संस्था
‘गोकुळ’ प्रकल्‍प येथे संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजवंदन झाले. ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्‍वजवंदन संघाचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर यांच्या हस्‍ते झाले. बोरवडे चिलिंग सेंटर संचालक किसन चौगले, लिंगनूर चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका अंजना रेडेकर, गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक सुजित मिणचेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे संघाचे अधिकारी यू. पी. मगदूम यांच्‍या हस्ते आणि संघाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले. शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, व्‍यवस्‍थापक प्रशासन डी. के. पाटील उपस्थित होते.
.......
रॉबिन हूड आर्मी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर रॉबिन हूड आर्मीच्या माध्यमातून एकाच वेळी चारशे शहरांमध्ये ध्वजवंदन आणि मिशन ७५ अंतर्गत भारत देशातील ७५ लाख लोकांना अन्नधान्याचे वितरण झाले. कोल्हापूर शहर तसेच परिसरातील गरजूंना रॉबीन हूड आर्मी कोल्हापूर मार्फत धान्य व इतर वस्तू असणारा ‘बॅग ऑफ होप’ हा उपक्रम गरजूंसाठी घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर रॉबिन्सच्या वतीने दिव्यांग, अंध व तृतीयपंथी यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. साहित्यामध्ये तांदूळ, डाळ, तेल यासह किराणा साहित्याचा समावेश होता. एकूण ५३५ बॅग ऑफ होपचे वितरण गरजूंना करण्यात आले. राजारामपुरी येथे ध्वजवंदन समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन साहित्य सुपूर्द केले.
............
भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघ
दक्षिण महाराष्ट्र बौद्ध विहार फाउंडेशन व भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष वसंत थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सहदेव कांबळे, दत्तात्रय इंगवले, अजित शिंदे, वसंत खोडकर, बाळासो सावर्डेकर, रजनी बेल्लारीकर, गुंडू कांबळे, शिवाजी चोपडे उपस्थित होते.
-
हुतात्मा निवृत्ती गोविंद
आडुरकर चॅरिटेबल ट्रस्ट
प्रा. तानाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ट्रस्टच्या अध्यक्षा भारती आडुरकर, शेवंता सुतार, मंगल आडुरकर, रोहिणी ओतारी, कविता सुतार, अर्चना भोसले, विद्या साळोखे, भाग्यश्री पवार उपस्थित होत्या.
-
बालकल्याण संकुल
बालकल्याण संकुलमध्ये उद्योजक शिरीष सप्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, सहमानद कार्यवाह एस. एन. पाटील, व्यंकाप्पा भोसले, अधीक्षक एस. एस. गोंजारे, डी. एम. थोरात, पी. के. डवरी, द्रौपदी पाटील, सचिन माने, नजिरा नदाफ, मीना कालकुंद्रे, टी. एम. कदम, स्मिता वायचळ उपस्थित होते.
-
पॅराडाईज ग्रुप
सुंदराबाई सांगावे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राजू पसारे, जयकुमार परमाज, अशोक पसारे, शुभंकर माने, गौरव पसारे, राजेश्वर पसारे, राजेश्वर पसारे, प्रथमेश दळवी, सत्यम पसारे, प्रकाश कुलकर्णी, फैज जमादार, शिवाजी पाटील, अतिश गावडे, सविता माने उपस्थित होते.
-
तराजू को-ऑप हौसिंग सोसायटी
रमेश जैन व अशोक जैन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राजमल परमार, उमेश बुधले, डोंगरचंद दोशी, अशोक जामसांडेकर, खजानिस हेमंत गांधी, प्रकाश चव्हाण, प्रदीप चौहाण, शारदा शिंदे, कांताबाई जैन, भुपेश ओसवाल उपस्थित होते.
-
संयुक्त मंगळवार पेठ
मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्मारकावर जयसिंग शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नागेश देवरूमठ, पंपू सुर्वे, बाबूराव चव्हाण, अब्दुलउल्ला, उदय पाटील, रमेश मोरे, नंदकुमार भोसले, नामदेव माळी, स. ना. जोशी, सुभाष पोवार, प्रशांत घाटगे, अशोक पोवार उपस्थित होते.
-
छत्रपती राजाराम महाराज
प्राथमिक शिक्षण सेवक पतसंस्था

संचालक मनोज सोरोप यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक फारूक डबीर, शहिदा कवठेकर, राजेंद्र गेंजगे, महेश आगळे, रहेमान मणेर, शब्बीद नदाफ, साजिदा तांबोळी, फरहत काझी उपस्थित होते.

पांजरपोळ संस्था
सुरेखा लिंबेकर व अजित लिंबेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्ष अरविंद वर्धमाने, खजिनदार वसंत शहा, रमन पटेल उपस्थित होते.
-
बाजार समिती
शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव जयवंत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपसचिव राहुल सुरवंशी, के. बी. पाटील उपस्थित होते.
-
तिरंगा महल
कोल्हापूर : प्राचार्य इस्माईल पठाण म्हणाले, ‘‘तिरंगा महल ही वास्तू लहान असली तरी उद्देश महान असल्याने तिरंगा महल ही राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे.’’ हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा महल येथे कार्यक्रम झाला. फारुक कुरेशी यांनी स्वागत केले. ओमर शरीफ मेस्त्री यांनी आभार मानले.
----
हॅण्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र
डॉ. शिवाजी पोवार-चिखलीकर व प्रा. डॉ. वासिम मुल्ला यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कमलेश कराळे, श्रद्धा जाजू, रूबीन लोखंडे उपस्थित होते.
-
एकटी संस्था
बेघर पुरुष निवारा शाहू नाका येथे स्वातंत्र्य दिन साजरा झाला. वरणगे येथील विधवा महिला वंदना गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव अर्चना जगतकर, सदस्य रमेश करांडे, शैला अडूरकर, शैला पाटील, रोटरी क्लब ऑफ होरायझनचे संदीप पोवार, राजेंद्रनगर येथील माजी नगरसेवक लालासो भोसले, एकटी संस्थेचे कार्यकर्ते पुष्पा कांबळे, दीपाली सटाले, अभिजित कांबळे, पुष्पा पठारे, विशाल पिंपळे, रोहिणी कांबळे, रोहित कांबळे, आर्यन कांबळे, कल्पना कदम, पूजा बारड, दीपाली मिसाळ, विकास कांबळे, लाभार्थी महिला, पुरुष उपस्थित होते.
.........................
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रायव्हेट हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध दंतवैद्य आणि माजी विद्यार्थी आशुतोष देशपांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूहगीते सादर केली. कार्यक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन उदय सांगवडेकर, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. ज. ल. नागावकर, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. सुनील कुबेर, मिलिंद करमळकर, केशव तिरोडकर, कार्यवाह एस. आर. डिंगणकर, कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर, मुख्याध्यापक सतीश भोसले, पर्यवेक्षक प्रसन्न जोशी आदी उपस्थित होते.
........

दि न्यू एज्युकेशन सोसायटी
सर्व शाखांतर्फे संस्थेच्या पेटाळा क्रीडांगणावर सचिव प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एन. सी. सी., आर. एस. पी. ग्रुप आणि विद्यार्थ्यांतर्फे जनरल सलामी दिली. न्यू हायस्कूल मराठी शाखेच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले. एन. सी. सी. ऑफिसर रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे सदस्य प्राचार्य एस. एस. चव्हाण, उमा भेंडीगिरी, सयाजी पाटील, शिक्षक प्रतिनिधी प्रदीप पोवार, संस्थेच्या सर्व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
...
देशभूषण हायस्कूल
देशभूषण हायस्कूल, श्री विद्यामंदिर आणि सुसंस्कार बालमंदिरात माजी सैनिक रविकांत उपाध्ये, कल्पना पाटील, उद्योजक अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. स्कूल कमिटी सदस्य मोहन अंकले, विद्याधर पाटील, स्कूल कमिटी अध्यक्ष पी. आर. पाटील, आर्किटेक्ट सुभाष भुर्के, शिवाजी पिसे, सौ. सुभेदार, श्री. व सौ. एम. एस. सावंत, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. देभूषण हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. ए. गाट यांनी प्रास्ताविक केले. व्ही. ए. पाटील यांनी परिचय करून दिला. श्री विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. वागरे यांनी आभार मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. आर. भेंडे यांनी नियोजन केले. मानसी माने यांनी सूत्रसंचालन केले.
...
राजर्षी शाहू महाराज हायस्कूल
निवृत्त कर्नल दिलीपसिंह थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कर्नल थोरात यांनी आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाची आणि भारत स्वातंत्र्य लढ्याची माहिती दिली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, प्राचार्य जे. आर. जोशी, मीना मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन केले. अमित कांबळे, के. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डी. व्ही. वाडीकर यांनी आभार मानले.
...
विद्यापीठ हायस्कूल
विद्यापीठ सोसायटीचे ट्रेझरर किरण रेडेकर यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. एन. सी. सी. आर., एस. पी. स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार, उपमख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या के. व्ही. भानुसे, पर्यवेक्षक व्ही. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी उपस्थित होते. के. एन. गावडे यांनी सूत्रसंचालन केले.
...
नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज
सचिन ढणाल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर अध्यक्षस्थानी होते. प्रशासक कादरभाई मलबारी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष आदिल फरास, शाळा समिती चेअरमन रफिक मुल्ला, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफीक शेख, अल्ताफ झांजी, हाजी जहांगीर अत्तार, फारूक पटवेगार, मलिक बागवान, हाजी पापाभाई बागवान, तसेच बाळासो मोमीन, दिलावर पठाण, झाकीर स्वार, नासिर धारवाडकर, सत्तार पठाण, नजीर थोडगे, हाजी रसूल पैलवान, राजू नदाफ, युनूस नदाफ, इलाई बांगी, फिरोज मुजावर, शफी धारवाडकर, अहमद शेख, नईम सय्यद, इर्शाद बंडवल, सलीम कुरणे, सरदार जमादार, जहाँगीर मुल्लाणी, बालेचाँद मालदार, सुलेमान मलबारी, अंजुम मलबारी, हाजी खलील मोमीन, दुलेखान मोमीन उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. काझी यांनी सूत्रसंचालन केले.
...
श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ
अध्यक्ष मेघराज खराडे यांच्या हस्ते आणि सचिव अजित खराडे, सहसचिव शिवतेज खराडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. राजनंदिनी सावंत, सलमा खान, प्रवीण खाणे, स्वरा जाधव यांची भाषणे झाली. एस. एस. प्रभावळे, आर. ए. साळसकर यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी मराठा हायस्कूल, संजीवन इंग्लिश स्कूल, फायर इंजिनिअरिंग व सेफ्टी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. शिवाजी मराठा हायस्कूल, सखारामबापू खराडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी. डी. काटकर यांनी प्रास्तविक केले. क्रीडा शिक्षक एस. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या सी. जी. खांडके, संजीवन इंग्लिशचे अमर सरनाईक, प्राचार्य अपूर्वा सरनाईक, फायर इंजिनिअरिंग व सेफ्टी मॅनेजमेंटचे युवराज पाटील, प्राचार्य किरण पाटील, डी. टी. एड.‌ कॉलेजचे प्राचार्य सिकंदर कांबळे, ग्रिफॉन एव्हीएशनचे नंदकुमार गुरव, जिजामाता महिला विद्यापीठाचे मगदूम उपस्थित होते.
...
कळंबा गर्ल्स हायस्कूल
सरपंच सागर भोगम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापिका एस. ए. जाधव यांनी स्वागत केले. संस्थाध्यक्षा एल. एस. सावंत, संस्था सचिव भारती सावंत, संस्था खजानिस एस. एस. आडसूळ, संस्थेचे सदस्य श्रीकांत आडसूळ उपस्थित होते.
...
इंदिरा गांधी विद्यानिकेतन
सुभेदार मेजर कांतू बाउचकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापिका एम. आर. मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षक ए. डी. शिंदे, एन. सी. सी. शिक्षक एस. डी. सोनार यांनी नियोजन केले. के. एन. सुतार यांनी सूत्रसंचालन केले.
...
वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय
प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भित्तीपत्रिका, रांगोळी स्पर्धेचे उद्‌घाटन सचिव धनंजय चाफोडीकर यांनी केले. प्रा. डॉ. एम. एस. पाटील, सुरभी जाधव, पूजा झाड यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. उर्मिला पाटील यांनी स्वागत केले. डॉ. अण्णासाहेब पाटील, शुभांगी पाटील, राजेंद्र मेस्त्री, ग्रंथपाल जी. एम. जिरगे, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्षा पाटील, कमलाकर गुरव, संतोष मिसाळ, ऋषिकेश शिंदे उपस्थित होते. डॉ. ए. आर. पाटील यांनी आभार मानले.
...
आर्यसमाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन
शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, शाहू दयानंद हायस्कूल तांत्रिक विभाग, आर्यसमाज बालमंदिर, शा. कृ. पंत वालावलकर मागासवर्गीय वसतिगृह शाखांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्ष ॲड. इंद्रजित पाटील कौलवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सचिव अॅड. अनिरुद्ध पाटील कौलवकर, नेहा पाटील, संचालक गणपतराव वारके, संचालक संजय पाटील-शिंगणापूरकर, भरत खानोलकर यांच्या उपस्थितीत सोहळा झाला. मुख्याध्यापिका एस. आर. कलिकते, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, सौ. मेटील, वसतिगृहाचे अधीक्षक अमोल पाटील, प्रशालेचे जी. एस. कुणाल हंकारे, एल. आर. सिद्धी त्रिमुखे उपस्थित होते.
...
संस्कार विद्यार्थी वसतिगृह
संस्थेचे खजानिश हिंदूराव जिरगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. १४ ऑगस्टला दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. १५ ऑगस्टला श्रीकांत राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, अधीक्षक ऋषभ सांगावकर, अमर वाळवेकर, पवन वाळवेकर आदी उपस्थित होते.
...
मास्टर दिनानाथ विद्यामंदिर
गोल सर्कल मित्र मंडळ रंकाळावेशचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शुक्रवार पेठ भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा पुष्पलता पाटील, मकरंद प्रेस शुक्रवार पेठचे अजित पोवार प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी स्वागत केले. सुरेश चौगले यांनी आभार मानले. धोत्री तालीम मंडळातर्फे सचिन राबाडे, वसंत वाडकर आदींनी विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप केले.
शुक्रवार पेठ भगिनी मंडळाच्या संचालिका शुभांगी भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा गायत्री निगवेकर, कविता राबाडे, तस्मिया नदाफ, समीना मेस्त्री, सबिना खान, शिक्षिका ऐश्वर्या बन्ने, शुभांगी अथणीकर, पालक वैभव रेवाळे, संगीता पाटील, मन्सुर बागवान, मोहसीन नदाफ, दिव्या गवळी, सबीना खान, नारायण येटाळे आदी उपस्थित होते.
...
श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत
ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह
महेंद्र कामत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव अमित सलगर, विश्वस्त बाबा वाघापूरकर, डॉ. गजानन आसगेकर, सचिन शानभाग, माजी अध्यक्षा डॉ. यशश्विनी जनवाडकर, सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष संजीव बोरकर, उपाध्यक्ष सचिन जनवाडकर, सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
...
ॲग्लो उर्दू हायस्कूल
शिरोली पुलाचीमध्ये मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. शालेय समितीचे चेअरमन मलिक इलाही बागवान यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रशासक कादरभाई मलबारी यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष आदिल फरास, वसीम वागवान, हमीद वागवान, जमील बागवान, मुश्ताक तहसीलदार, बाबासाहेब शेख, अंजूम देसाई मेहबूब सनदे, अल्लाऊद्दीन मुल्ला, सलीम महात, बालेचाँद सनदे, सिकंदर सनदे, सलीम वाईकर, सरदार मुल्ला, मामाजी कच्छी, संचालक पापाभाई बागवान, रफीक शेख, आल्ताफ झांजी, लियाकत मुजावर, फारूक पटवेगार, रफीक मुल्ला, मुनीर सनदे, मन्सूर नदाफ, यासीन उस्ताद, बापू मुल्लाणी, हिदायत पटेल, सुनील सूर्यवंशी, आरिफ कच्छी, नजरूद्दीन मुल्ला, माणिक मुल्ला उपस्थित होते. पटवेकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एम. एच. मोमीन यांनी स्वागत केले. डब्लू. के. नसरदी यांनी सूत्रसंचालन केले. जहाँगीर आत्तार यांनी आभार मानले.
..
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज
शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य जे. आर. जोशी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. माजी विद्यार्थी डॉ. अजय संकपाळ प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यालयाला ५० हजार रुपयांची देणगी दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारितोषिक देऊन केला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांची ‘विद्यासमिती’ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान केला
....
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, न्यू प्राथमिक विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा केला. संस्था अध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी स्वागत केले. न्यू कॉलेजच्या प्रा. मनीषा नायकवडी यांनी वंदे मातरम सादर केले. उपप्राचार्य यू. आर. आतकिरे यांनी आभार मानले. एन. सी. सी. ऑफिसर एस. एस. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. चेअरमन के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालिका सविता पाटील, संचालक आर. डी. पाटील, आजीव सेवक प्रा. सी. एम. गायकवाड, उदय पाटील, सचिव एस. जे. मेटील उपस्थित होते.
...
मास्टर दीनानाथ विद्यामंदिर
शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) उपसंचालक कार्यालय रवींद्रनाथ चौगले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश चौगले यांनी आभार मानले. पुष्पलता पाटील, गायत्री निगवेकर, पूर्वी रेवाळे, संगीता पाटील, मीसबा बागवान, सबीना खान, दगडू कात्रट, ऐश्वर्या बन्ने, शुभांगी अथणीकर उपस्थित होते.
...
न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी
नायब सुभेदार सूर्यकांत सातपुते यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रा. अशोक साठे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना दिली.
...
इंदूमती हायस्कूल
महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या बीना मोहिते, शकुंतला जाधव, हर्षदा मेवेकरी, मुख्याध्यापिका शैलजा भोसले, पर्यवेक्षिका वर्षा पाटील उपस्थित होत्या.
-
प्रथमेशनगर अंगणवाडी क्र. १८२
कोल्हापूर : प्रथमेशनगर मधील अंगणवाडी क्र. १८२ येथे मुलांची तिरंगा रॅली आणि पालकांसाठी तिरंगा पाककला कृती स्पर्धा झाली. रॅलीचा प्रारंभ माजी सैनिक दिलीप हंकारे व दत्तात्रय पंडे यांच्या उपस्थितीत झाला. दिलीप खांबे व मंगला भोई, सुप्रिया वाडकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. पाककृती स्पर्धेत पालकांनी तीन रंगाच्या इडली, ढोकळा खोबऱ्याची बर्फी, अप्पे, मोदक असे विविध पदार्थ केले होते. अंगणवाडी सेविका गीता पाटील व पूनम पाटील यांनी आयोजन केले. सरिता निंबाळकर व सुनीता सुतार यांनी परीक्षण केले.
-
महात्मा फुले हायस्कूल
लक्षतीर्थ वसाहतमध्ये माजी नगरसेवक आनंद खेडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक पवार, एल. एम. पोवार, उमेश गुरुजी उपस्थित होते.
-
श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन
श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर, श्रीदत्ताबाळ शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक सचिन डंवग यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, नीलेश देसाई, विश्वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, रोहिणी शेवाळे, प्रणिता वणकुद्रे, बालाजी मुंडे, सारिका चव्हाण उपस्थित होत्या.
-
प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा
व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बंडा कुंभार, प्रा. सुनील भोसले, शीला भोसले, रघुनाथ कांबळे, शिवाजी कोरवी, कृष्णात पाटील उपस्थित होते.
-
सागर शिक्षण मंडळ
दत्तराज बालकमंदिर, सरस्वती चुनेकर विद्यामंदिर, नानासाहेब गद्रे हायस्कूलमध्ये उद्योजक प्रकाश राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उदय धारवाडे, मनीषा दमामे, नारायण इंगवले, अशोक सडोलीकर उपस्थित होते.
-
जय भारत शिक्षण संस्था
जय भारत हायस्कूल, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, सौ. सरस्वती सावंत बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजवंदन डॉ. जनार्दन पाटील यांच्या हस्ते झाले. सुमित्रा जाधव उपस्थित होत्या.
-----------------
संस्कार विद्यामंदिर शिये
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बुवा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शियेचे सरपंच जाधव, उपसरपंच प्रभाकर काशीद, माजी जि.प. सदस्य मनीषा कुरणे, माजी जि.प. सदस्य बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, जयसिंग पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. एस. नाळे, शिक्षक एस. व्ही. पाटील, पी. डी. वांद्रे, एस. एल. चौगुले, एस. एस. मोमीन, सी. पी. चौगुले, सौ. एस. डी. भारती, आर. बी. देशमुख, निवास पाटील उपस्थित होते.
...
ंंंसंजीवन इंग्लिश मीडियम
स्कूल, लिटल वंडर्स प्ले ग्रुप
मेघराज खराडे, शिवतेज खराडे, शाळेचे चेअरमन अमर सरनाईक, संचालक युवराज पाटील, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्या स्नेहा पाटील, विभाग प्रमुख सुप्रिया किरवेकर, स्नेहा कदम, शुभदा कामत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन
चेअरमन हर्षद दलाल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्ष दिनेश बुधले, सचिव कमलाकांत कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. ‘कोल्हापूर उद्यमवार्ता’च्या स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे प्रकाशन झाले. मुख्य संपादक नितीन वाडीकर, पीआरओ प्रशांत मोरे, पूर्वांक दलाल, पियूष दुधाणे, ऋशिराज बुधले, आदित्य कोंडेकर, पूजा वाडीकर, आश्विका दलाल, साक्षी कोंडेकर, फारूक हुदली, सभासद हिंदूराव कामते, सुशिल हंजे, मालती फौंडर्सचे संजय पाटील, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन मेनन, श्रीकांत दुधाणे, बाबासो कोंडेकर, अमर करांडे, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, बाबूभाई हुदली, प्रदीपभाई कापडिया, चंद्रकांत चोरगे, अशोकराव जाधव, हिंदूराव कामते, संजय पाटील, किरणभाई वसा, विनय सांगले, केदार हसबणीस, कुशल सामाणी, शामसुंदर देशिंगकर, विश्वजित सावंत, सागर जाधव, नरेंद्र माटे, शांताराम सुर्वे, शैलेश पुरोहित, सुभाष चव्हाण, नंदकुमार नलवडे, ऋषिराज बुधले, पूजा वाडीकर, सूर्यकांत खोत, प्रशांत मोरे, तुषार सुतार, राम कुंभार, अमित संरमजामे, भगवान माने उपस्थित होते.
...
कोल्हापूर कापड व्यापारी संघ
संचालक मिलिंद शहा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्ष संपत पाटील, सचिव विठ्ठलराव कालेकर, संचालक दीपक बोधे, मनीष झंवर, सुभाष वेल्हाळ, भरत गवळी उपस्थित होते.
...
शाहू मॅरेथॉन
शाहू मॅरेथॉनचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, शारदा जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाहू मॅरेथॉनचे सर्व कार्यकर्ते, इंदुमती हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्स, सीमा सूर्यवंशी, बेळगांव मराठा बॅंकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर. डॉ. बाटे, शंकरराव सूर्यवंशी उपस्थित होते.
-
वेगळी लावा
00622
क्षेत्र प्रयाग ः येथील पुराच्या पाण्यावर लेसर लाईटच्या साह्याने साकार केलेला तिरंगा.

प्रयाग संगमावरील पाण्यावर
लेसरद्वारे साकारला तिरंगा

प्रयाग चिखली ः येथील सरदार तालीम मंडळ, तसेच रुबाब ग्रुपतर्फे संगमाच्या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये लाईट व लेसर शोने पाण्यावर राष्ट्रध्वज तिरंगा साकारण्यात आला. १५ ऑगस्टच्या सायंकाळी सात वाजता लाईट- लेसर शो परिसरातील प्रमुख आकर्षण बनले. या ठिकाणी अद्याप पुराचे पाणी असल्याने पुलावरून लाईट- लेसरद्वारे पाण्यामध्ये राष्ट्रध्वज तिरंग्याचे चित्र निर्माण केले गेले. उद्‌घाटन प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने विधवांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्य दिनानिमित्त एक दिवसाच्या सरपंच पदाचा मान दिलेल्या सरपंच संगीता मधुकर बोराटे यांच्या हस्ते, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, चिखलीच्या सरपंच उमा संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87525 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..