सुती-चौंडक्याच्या मंजुर स्वरांना हिडीस नृत्याचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुती-चौंडक्याच्या मंजुर स्वरांना हिडीस नृत्याचे ग्रहण
सुती-चौंडक्याच्या मंजुर स्वरांना हिडीस नृत्याचे ग्रहण

सुती-चौंडक्याच्या मंजुर स्वरांना हिडीस नृत्याचे ग्रहण

sakal_logo
By

सुती-चौंडक्याच्या मंजुळ स्वरांना हिडीस नृत्याचे ग्रहण
---
शहराच्या सांस्कृतिक परंपरेला छेद, अपप्रवृत्ती वेळीच रोखण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः ‘शिवशंभूची तू सखया, आदिशक्ती महामाया, माता यल्लमा जय जय यल्लमाऽऽऽ यल्लमाऽऽऽ'' असा महिमा शहरातील ७० ते ८० टक्के घरात हमखास गायिला जातो. मंगळवार देवीचा वार म्हणून अजूनही कैक घरांत या दिवशी मांसाहार वर्ज्य केला जातो. मात्र, याच आदिशक्ती महामायेच्या श्रावणातील आनंदोत्सवात विविध अपप्रवृत्ती बळावत चालल्या आहेत आणि त्याला वेळीच रोखण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. काल (ता. १५) श्रावणातील तिसऱ्या सोमवारी परंपरेप्रमाणे देवीचा स्नानसोहळा झाला. पण, यानिमित्त सिस्टिमच्या तालावर हिडीस नृत्यांचा जल्लोष रंगला आणि सुती-चौंडक्याचा मंजुळ स्वर कुठल्या कुठे विरून गेला.
मुळात जिंदादिली कोल्हापूरकर आणि आनंदोत्सव हे एक अतूट समीकरण. प्रत्येक गोष्टीत इथं आनंद शोधला जातो आणि तो तितक्याच दिलखुलासपणे साजरा केला जातो. अगदी पंचगंगेला नवं पाणी आलं आणि ते पात्राबाहेर पडलं की त्या पाण्यात वाहने रेस करून कारंजांची उधळणही येथे होते आणि पुढे याच पाण्याच्या साक्षीने त्र्यंबोली यात्राही तितक्याच जल्लोषात साजरी होते. आषाढातील सेलिब्रेशननंतर अर्थातच श्रावणातील आनंदोत्सवही तितक्याच उत्साहात येथे साजरा होतो. याच आनंदाच्या पर्वणीतील रेणुका देवीच्या मानाच्या जगांचे स्नान हा एक महत्त्वाचा सोहळा. स्नान सोहळ्यानंतरची निघणारी मानाच्या जगांची मिरवणूक भाविकांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडते. मात्र, गेल्या काही वर्षांत या सोहळ्यात काही अपप्रवृत्ती बळावत चालल्या असून, कालच्या प्रकाराने तर त्याची परिसीमा गाठली आणि पाहता-पाहता काही सेकंदात हा सारा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोचला.

चौकट
सोहळा नेमका कशासाठी?
रेणुका देवीच्या स्नानसोहळ्यानिमित्त देवीच्या जोगत्यांचा सन्मान व्हावा, हा एक महत्त्वाचा उद्देश. मुळात या मंडळींना नटून-थटून स्वतःचा म्हणून आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आजही फारशी मिळत नाही. या सोहळ्याच्या निमित्ताने ही मंडळी एकवटतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत काही मोजक्याच थिल्लर आणि आंबटशौकिनांमुळे या सोहळ्यात अपप्रवृत्ती आल्या आणि त्या आता अधिकच बळावत चालल्या आहेत. एकीकडे राजर्षी शाहूंचे पुरोगामी शहर म्हणून बिरूद मिरवायचे आणि त्याचवेळी असल्या प्रकारांना आपण प्रोत्साहन देणार का, असा संतप्त सवाल यानिमित्त आता उपस्थित होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87557 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..