आजरा ः आग बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आग बातमी
आजरा ः आग बातमी

आजरा ः आग बातमी

sakal_logo
By

आजऱ्यात घराला आग लागून
प्रापंचिक वस्तूंचे नुकसान
आजरा ः येथील लिंगायत गल्लीमध्ये आज अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या घराला लागलेल्या आगीत प्रापंचिक वस्तुंचे नुकसान झाले आहे. दोन खोल्यांमधील फर्नीचर व वस्तू जळाल्या आहेत. आज दुपारी एकच्या सुमाराला ही आग लागली. दरम्यान गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. शार्ट सर्किटल्यामुळे आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती. दुसऱ्या मजल्यावर आज दुपारी काहीतरी जळत असल्याचा वास कुटुंबीयांना आला. दुसऱ्या मजल्यावर पोहचल्यावर पलंगाला आग लागल्याचे दिसून आले. गल्लीतील तरुण मदतीसाठी धावले. काहींनी नगरपंचायतीला संपर्क केला. फायर बुलेटची मदत बोलावली. गडहिंग्लज नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

३१५४

कुंभारवाडीत तरुणाची आत्महत्या
पुनाळ : कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल दत्तात्रय कर्ले (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत सीपीआर पोलिस चौकीत नोंद आहे. सोमवार (ता. १५) ध्वजवंदन झाल्यानंतर घरी येऊन तो झोपायला जातो म्हणून वरच्या खोलीत गेला. जाताना दुपारी चार वाजता उठवायला सांगितले होते. चार वाजता उठवायला गेले असता अनिलने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी व दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

कळेत बेकरीतून मुद्देमाल पळविला
कळे : येथे बेकरीतील पस्तीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. सोनाजी भगवान पाटील (कळे) यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मल्हारपेठ फाट्यावर श्री. पाटील यांचे जोतिर्लिंग बेकर्स नावाचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून त्यांचा कामगार पांडुरंग पोळ (बळीपवाडी) घरी आला. दरम्यान, रात्री चोरट्यांनी पत्रा उचकटून बेकरी साहित्य, सिगारेटची पाकिटे, कोल्ड्रिंक्स बाटल्या, सीसीटीव्ही कॅमेरा, डी.व्ही.आर. सेट, एलसीडीसह दोन हजार चारशे रुपये रोकड मिळून ३५ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पळविला. सकाळी दुकान उघडले असता श्री.पोळ यांच्या घडला प्रकार निदर्शनास आला. हेड कॉन्स्टेबल महेश माळवदे अधिक तपास करत आहेत.

टायर चोरट्यास अटक
जयसिंगपूर : डवरी सोसायटीत किरण कृष्णाप्पा चव्हाण यांच्या ३० हजारांच्या टायरी चोरीला गेल्याची घटना घडली होती. स्मिता कांबळे, रोहित डावाळे, होमगार्ड हुसेन जतकर यांच्या पथकाने सापळा रचून निलेश नरसू फाकडे (वय २४, रा.संभाजी चौक, हरीपूर ता.मिरज) याला मुद्देमालासह चिपरी (ता. शिरोळ) येथील फाट्यावर ताब्यात घेतले. दरम्यान फाकडे याने या टायरी चोरल्याची कबूली जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.

निमशिरगावातून तरुणाचे अपहरण
जयसिंगपूर : निमशिरगाव (ता.शिरोळ) येथे रस्ता विचारणाचा बहाणा करून वसंत सोपान कांदे (वय ३७, कांदेवाडी, ता.धारूर जि. बीड) या तरुणाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद महादेव बाबूराव उजगरे (रा.हिंगणी ता.धारूर जि.बीड) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. अधिक माहिती अशी, चार अनोळखींनी निमशिरगाव येथे रस्ता विचारण्याचा बहाणा केला आहे. वसंत कांदे यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून कोल्हापूरच्या दिशेने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मासेवाडीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
उत्तूर ः मासेवाडी (ता. आजरा) येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी आजरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. अनोळखीने मुलीस फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस नाईक राजेश आंबूलकर करीत आहेत.

होसूरमध्ये सिलिंडरची चोरी
कोवाड : होसूर (ता. चंदगड) गावाशेजारी कर्नाटकच्या हद्दीवर शशिकांत संभाजी पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या चहाच्या दुकानात सोमवारी रात्री चोरी झाली. दुकानाच्या दरवाजाचे कुलूप दगडाने तोडून चोरट्यानी सिलिंडर टाकीसह १० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. मंगळवारी सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनाला आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87590 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..