स्वातंत्र्य दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन

sakal_logo
By

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात

रजपुतवाडी परिसर
प्रयाग चिखली ः रजपुतवाडी (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फे विधवा भगिणी लक्ष्मीबाई मधुकर कांबळे, लता लक्ष्मण पाटील, आक्काताई शिवाजी गोसावी यांचे हस्ते ध्वजवंदन झाले.
ग्रामपंचायत येथे विधवा भगिणी इंदुबाई बाळसिंग रजपूत, अपंग नामदेव रामचंद्र पाटील, तर 15ऑगस्टला सरपंच राजेंद्र कोळी यांच्या हस्ते झाले. उपसरपंच अमृता कोळी, गटनेते व माजी सरपंच रामसिंग रजपूत, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे, मंदाताई पाटील, गीता शिंदे, शोभा चव्हाण, विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष राहुल काशीद, नामदेव पाटील, शालेय समिती अध्यक्ष सुरेश माने उपस्थित होते.
-
वारकरी संप्रदाय
श्री गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या मठामध्ये महादेव महाराज यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राष्ट्रगीत, पसायदान सादर केले. राजेंद्र वेल्लाळ, पुरुषोत्तम यादव, ज्ञानेश्वर यादव, हरिश्चंद्र तळप, श्री. शेलार, सुरज सुतार, वारकरी मंडळी उपस्थित होते.
...
कौटुंबिक न्यायालय
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधिश प्रशांत अग्निहोत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मानसी बेलापूर यांनी शिव पोवाडा सादर केला. न्यायाधिश डॉ. अनिता नेवसे, निलेश रणदिवे उपस्थित होते. तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र पाटील, सचिव अॅड. तेहजित नदाफ, उपाध्याक्ष अॅड. अजित मोरबाळे, लेखापरिक्षक अॅड. प्रमोद दाभाडे, स्मिता शिंदे, सुमित शेळके, दिप्ती घाटगे, सुवर्णा कांबळे, मनिषा सुतार, प्रविणकुमार यादव उपस्थित होते.
...
शांतीनिकेतन स्कूल
‘शांतीनिकेतन स्कूलची माजी विद्यार्थीनी आणि सी.बी.एस.ई. २०२२ च्या १२ वी बोर्डात जिल्हा शालेयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेली महिमा शितल संघवी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संचालिका राजश्री काकडे प्रमुख उपस्थित होत्या. महिमा संघवी म्हणाल्या, ‘‘माझ्यासारख्या माजी विद्यार्थीनीला अमृत महोत्सवी वर्षाचे ध्वजवंदन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शांतीनिकेतन परिवाराचे आभार मानत आहे.’’ कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनिषा पाटील, उपप्राचार्य श्रीपाद पाटील उपस्थित होते.
...
ज्ञानहो–विद्यामंदिर
१३ ऑगस्टला संस्थेचे अध्यक्ष टी. एम. कदम, १४ ऑगस्टला प्राचार्य मयुरी कदम, १५ ऑगस्टला पोलिस कॉन्स्टेबल दिनेश डोंगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नेहा जाधव यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी जाधव, कल्याणी जाधव यांनी संयोजन केले.


श्री महालक्ष्मी सहकारी बॅंक
श्री महालक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेत अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संचालक केदार हसबनीस, श्रीकांत हेर्लेकर, ॲड. रवि शिराळकर, ॲड. राजेंद्र किंकर, उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुलकर्णी उपस्थित होते.

साईसम्राट इन्स्टिट्यूट
विविध उद्योगाचे मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांबवे परिसरातील शेतकऱ्यांसमवेत स्वातंत्र्यदिन झाला. डॉ. अशोक पाटील, साईली पाटील, माजी सरपंच तानाजीराव मोरे, संभाजी मोरे, विजयसिंह घोरपडे, धनाजी गायकवाड, दादासाहेब देसाई, राहुल मोरे, मधुकर पाटील, सुदाम राऊत, हंबीरराव चव्हाण, सविता राऊत, उमेश पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते.

व्हाईट आर्मी स्कूल
व्हाईट आर्मी स्कूल (राजारामपुरी विद्यालय) वर्षानगर येथे माजी सैनिक सुभेदार मेजर मधुकर लोंढे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे, उदय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. वर्षानगर परिसरातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.

उदयप्रभाश्रीजी शिक्षण मंडळ
नेज (ता. हातकणंगले) येथील साध्विजी उदयप्रभाश्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या प्रांगणात ध्वजवंदन सोहळा झाला. रज्जू कटारिया व वनेचंद कटारिया प्रमुख उपस्थित होते. विदुला शहा, अनिल शहा, सुनित परिख, मनोज शहा, अनिल शहा, निवेदिता शहा, हर्षा शेठ, हरेश शेठ, संस्थेचे सचिव अतुलभाई शहा, उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, संचालक तानाजी चव्हाण, शीतल खिचडे आदी उपस्थित होते.

सराफ व्यापारी संघ
कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, प्रामाणिक कर्मचाऱी, निवडणूक अधिकारी, ६१ वर्षे पूर्ण झालेल्या सभासद, नवीन सभासद, सल्लागार समिती, संघाचे सभासद अमर पाटील, दिनकर लाळगे व अर्पित जोशी यांचाही विशेष कार्याबद्दल सत्कार झाला. अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम आदी उपस्थित होते.

अनुष्का चॅरिटेबल ट्रस्ट
आर. के. नगरातील मातोश्री वृध्दाश्रमात स्वातंत्र्यदिन झाला. ट्रस्टचे अध्यक्ष संतोषराव जाधव, युवराज पाटील, प्रविण टिके, सौरभ गवळी उपस्थित होते.

जे जे रोलर स्केटींग
पारंपरिक वेशभूषेत एक तास स्केटिंग करण्यात आले. याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि ग्लोबल जीनियस रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे. अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, रमेश मोरे, प्रशिक्षक जयराम जाधव, महिला प्रशिक्षक तेजस्विनी जाधव, निखिल चव्हाण उपस्थित होते.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन
सचिव माणिक मंडलिक याच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नंदकुमार बामणे, नितीन जाधव, विश्वंभर मालेकर, संजय पोरे उपस्थित होते.

आम आदमी रिक्षा संघटना
शहरातील रिक्षाचालकांना जिलेबी वाटप झाले. विविध भागांतील रिक्षा थांब्याना भेटी देऊन रिक्षा चालकांशी संवाद साधण्यात आला. सवलतीच्या दरात राबिवण्यात येणाऱ्या विमा योजनेची माहिती देण्यात आली. संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई, अध्यक्ष राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष लाला बिरजे, सचिव बाबुराव बाजारी, खजिनदार मंगेश मोहिते आदी उपस्थित होते.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  संग्राम घोरपडे, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन प्रमुख उपस्थित होते. कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, सीएचआरओ श्रीलेखा साटम, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. जावेद सागर, डॉ. सुचित्राराणी राठोड, रुधिर बारदेस्कर, उपकुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे, कृष्णात निर्मळ, अजित पाटील, डॉ. राम पवार, अभियांत्रिकी महाविद्यालय येथे तळसंदे विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, संग्राम घोरपडे , जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ राहुल पाटील, हॉटेल सयाजी येथे पृथ्वीराज पाटील, संग्राम घोरपडे, प्रा. सदानंद सबनीस, तुषार भोसले ज्युनिअर कॉलेज येथे  अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील उपस्थित होते.
-
शाहूनगर परिसर
मिलिंद हायस्कूलमध्ये माजी नगरसेविका छाया पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. मुख्याध्यापक एम.एम. शिर्के, बी.एम. नदाफ, उमेश पोवार, काकासो पाटील, सोनल शिर्के, अमर शिर्के उपस्थित होते.
-
कोरगावकर हायस्कूल
एम. एम. शेख फाउंडेशनचे संस्थापक महंमद यासीन शेख यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक संजय सौंदलगेकर, ज्येष्ठ शिक्षक वसंत पाठक, सुभाष संकपाळ, पर्यवेक्षिका व्ही. व्ही. कुलकर्णी, मानसिंग हातकर, सुनिता कागणीकर उपस्थित होते.
-
म.दु. श्रेष्ठी समता हायस्कूल
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे सचिन बेनाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक शशिकांत सावंत, विजय कोरवी, सुमन घोडके उपस्थित होते.
-
सुनीतादेवी सोनवणे हायस्कूल
ऑनररी कॅप्टन प्रभाकर कुंभार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक धनाजी बेलेकर, महेश पाटील, मनीषा शिरगावे, सागर आळवेकर दत्तात्रय कोळेकर, गजानन काटकर, गुरुनाथ घरत, किरण निकाळजे, विकास मोरे, विशाल सरवदे उपस्थित होते.
-
कोल्हापूर परीट समाज
समाज महिला मंडळच्या अध्यक्षा मानसी भालकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रकाश भालकर, दीपक लिंगम ,वसंत वाठारकर, महेशकुमार खडके, कविता भालकर उपस्थित होते.
-
महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक)
विद्युत मंडळ कामगार सहकारी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मोहन नाईक, दिलीप कोळी, सचिन शिंदे, विलास गोखले आदी उपस्थित होते.
-
वि. स. खांडेकर प्रशाला
रोटरी क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष अरविंद तराळ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सचिव प्रदीप कारंडे, खजिनदार नेताजी कानकेकर, जीनरत्न रोटे, मुख्याध्यापिका नेहा कानकेकर, भरत शास्त्री उपस्थित होते.
-
ताराराणी विद्यापीठ
माजी प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष अशोकराव पर्वते, विश्वस्त डॉ. भारती शेळके, जयश्री पाटील, प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, राजनंदा देशमुख, शोभा चौधरी उपस्थित होते.
-
भारत हाऊसिंग सोसायटी
अध्यक्ष दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्ष सविता जाधव, अतुल कारंडे बाबासाहेब पाटील, अनिल इंगवले, शिवाजी जाधव, उदय सावंत, सुमन वाडेकर उपस्थित होते.
-
लोकराज्य जनता पार्टी
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष पी. के. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण, विजय केसरकर, शशिकांत जाधव, अशोक तोरसे, हिंदुराव पवार, कृष्णात सातपुते, सुनील कुंभार, प्रशांत निकम उपस्थित होते.
-
समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय
उचगाव ः उद्योजक बाळमुकुंद गवळी, अभिजित मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी "बाल क्रांतीकारक शिरीषकुमार" ही नाटिका सादर केली. माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीते व नृत्याचे सादरीकरण केले. विभावरी सावंत यांनी प्रास्ताविक केले. मुग्धा गोरे-लिंगनूरकर यांनी सूत्रसंचालन केले. मोनिका गिरीगोसावी यांनी आभार मानले.
-
उज्वल हाऊसिंग सोसायटी
उजळाईवाडी ः सेवानिवृत्त कर्नल अमरसिंह सावंत यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिन झाला. सावंत क्लबच्या योद्धांनी लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. प्रमुख पाहुणे कर्नल मंजुनाथ हेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले.माजी सैनिक शेंद्रे, चेअरमन मारुती पाटील, अशोकराव पाटील, कुरेशी, संदीप अंकले, सागर पाटील उपस्थित होते.
-
निगवे दुमाला
भुये: निगवे दुमाला येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर विधवा महिला भागीरथी रामराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच योजना किडगावकर, उपसरपंच सुरज एकशिंगे, राजाराम कोळी, धनाजी पाटील, दिपाली चौगले, धनश्री कासार, संकेत बाडकर, गिरीष पाटील, अश्विनी कांबळे, रूपाली पाटील, पूजा माळी, ग्रामस्थ उपस्थित होते.
-
पाटील हायस्कूल
भुये ः येथील कै. झानू धोंडी पाटील हायस्कूलमध्ये १३ ऑगस्टला जेष्ठ नागरिक सदाशिव पाटील व माजी सैनिक दिपक शिंदे यांच्या हस्ते, १४ ऑगस्टला सुलभा पाटील व वृषाली पाटील यांच्या हस्ते व १५ ऑगस्टला संस्थेचे सचिव भारत पाटील भुयेकर यांच्या हस्ते ध्ववंदन झाले. मुख्याध्यापक पी.व्ही. लोहार, विक्रम पाटील, बाबासो पाटील, शंकर पाटील, प्रमोद पाटील, विलास पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते.
-
सडोली खालसा
हळदी ः सडोली खालसा (ता.करवीर)येथे १३ ऑगस्टला सुनिता मधुकर कुंभार यांच्या हस्ते, १४ ऑगस्टला माजी सैनिक मोहन गणपती कुंभार व १५ ऑगस्टला सरपंच अमित मारुती पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपसरपंच तेजस्विनी पाटील, ग्रामविकास अधिकारी ए. एम. कोठावळे उपस्थित होते.
-
कुंभी परिसर
कुडित्रे ः कुंभी कारखाना येथे अध्यक्ष चंद्रदिप नरके यांच्या हस्ते, श्रीराम हायस्कूल जुनियर कॉलेज येथे आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते, सांगरुळ हायस्कूल येथे अध्यक्ष य. ल. खाडे यांच्या हस्ते, स.ब. खाडे महाविद्यालय येथे के.ना. जाधव यांच्या हस्ते, यशवंत बँक येथे संचालक आनंदा पाटील यांच्या हस्ते, कुंभी बँक येथे अजित नरके यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. वाकरे विद्यार्थ्यांची २७५ फूट लांब ध्वज घेऊन तिरंगा रॅली काढण्यात आली.
-
सांगवडेवाडी परिसर
सांगवडेवाडी ः येथे ग्रामपंचायत मध्ये सरपंच वैशाली कलकुटकी, सांगवडे येथे सरपंच रूपाली कुंभार यांनी, वसगडे येथे उपसरपंच संजय पाटील यांनी, हलसवडे येथे सरपंच उज्वला दांडगे यांनी ध्वजवंदन केले.
-
यशवंत विद्यालय
कंदलगाव ः गजानन महाराज नगर येथे संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ट्रस्टी लक्ष्मण पंडे, मुख्याध्यापक संतोष पाटील उपस्थित होते.
-
सानेगुरुजी वसाहत परिसर
सानेगुरुजी वसाहत ः येथील संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ, इंदुमती जाधव विद्यालय, संकल्प माध्यमिक विद्यालय, प्रेरणा बालक मंदिर, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने आयोजित संचालक संजय चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गजानन विभुते यांच्या हस्ते, कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय सैन्य दलातील नाईक प्रांजल पाटील यांच्या हस्ते, राजर्षी शाहू हायस्कूल रिंग रोड फुलेवाडी संस्थेचे अध्यक्ष सुनील साळोखे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
-
सावर्डे दुमाला परिसर
येथे अनुसया सुतार, इंदूबाई भोसले यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायतीत उपसरपंच शालाबाई निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. युवराज कारंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप झाले. दीपक जगताप यांनी प्राथमिक शाळेस तिजोरी, पुस्तके भेट दिली. माजी सरपंच कुंडलिक कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सी. एस. पाटील, दीपक तोरस्कर, माजी सैनिक गणपती कांबळे, संतोषकुमार पाटील, पंढरीनाथ मोहिते, लक्ष्मीबाई निकम, दत्तात्रय निकम उपस्थित होते. आभार ग्रामसेवक पांडुरंग बीडकर यांनी मानले.
शिरोली दुमालात व्यापारी संघटनेकडून ५० किलो जिलेबी वाटप केली. अनंत ज्वेलर्सचे मालक श्याम बारसकर, सुभाष पलंगे, बाळासो जाधव, संजय कदम, भाजपचे दादासो देसाई, दत्ता कुंभार, राम कुंभार, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.
-
प्रयाग चिखली
प्रयाग चिखली ःविधवा महिलांच्या सन्मानार्थ येथील ग्रामपंचायतीने विधवा भगिनी बोराटे यांना एक दिवसाच्या सरपंच पदाचा मान देण्यात आला. सरपंच उमा संभाजी पाटील, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील निवृत्त पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, संपतराव दळवी, बळी कळके उपस्थित होते. १३ ऑगस्टला विधवा महिला येसाबाई कृष्णात पाटील यांच्या हस्ते तर १४ ऑगस्टला श्रीमती कमल कृष्णात चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेत माजी सैनिक कुंडलिक चव्हाण, आजी सैनिक रणजीत कुरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
-
गोशिमा कार्यालय
उजळाईवाडी ः गोशिमा कार्यालयात अध्यक्ष मोहन पंडितराव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. परिसरातील १ राष्ट्रपती पदक विभुषीत वीरपत्नीचा व १५ माजी सैनिकांना गौरविणले.
यावेळी गोशिमाचे उपाध्यक्ष दिपक चोरगे, मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, खजिनदार स्वरूप कदम, संचालक सुरजितसिंग पवार, सुनिल शेळके, रणजित पाटील, संजय देशिंगे, सल्लागार संचालक सर्वश्री. योगेश कुलकर्णी, राजेंद्र माळी, निमंत्रित संचालक सर्वश्री नचिकेत कुंभोजकर, प्रशांत मेहता, शिवाजीराव सुतार, रामचंद्र लोहार, अमोल यादव, सतीश माने, रणजित मोरे, उद्योजक देवेंद्र दिवाण, वीरपत्नी सविता बिरंजे, माजी सैनिक संभाजी भोसले, जिवन देसाई, नामदेव शिंदे, विलास चव्हाण, जकाते, केरबा पाटील, एस.एस.पाटील, बाळासाहेब बुलगीर, अनिरुद्ध उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87606 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..