चार दिवसात पाऊणे दोन लाख भाविकांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार दिवसात पाऊणे दोन लाख भाविकांची उपस्थिती
चार दिवसात पाऊणे दोन लाख भाविकांची उपस्थिती

चार दिवसात पाऊणे दोन लाख भाविकांची उपस्थिती

sakal_logo
By

43633

पाऊणे दोन लाख भाविक
श्री अंबाबाईच्या चरणी

सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांची पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांची पर्वणी साधत पाऊणे दोन लाख भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी दर्शनासाठी आले. त्यामुळे मंदिर परिसरातील विक्रेत्यांचीही मोठी उलाढाल झाली.
शनिवार, रविवार, काल सोमवारी स्वातंत्र्यदिनाची आणि आज फरवर्दिन अशी चार दिवसांची सलग सुट्टी आल्याने पर्यटकांनी श्री अंबाबाई दर्शनासह पर्यटनासाठी शहर आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली. गुरूवारी (ता.११) अठरा हजार सहाशेवर भाविकांनी तर शुक्रवारी (ता.१२) तेवीस हजार आठशेवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. शनिवारी (ता.१३) बावीस हजार चारशे, रविवारी (ता.१४) पासष्ट हजारावर तर काल अठ्ठावन्न हजारांवर भाविक दर्शनासाठी आले. मात्र, त्या तुलनेत आज बावीस हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरात गर्दी होवूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87612 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..