जगन फडणीस पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगन फडणीस पुरस्कार
जगन फडणीस पुरस्कार

जगन फडणीस पुरस्कार

sakal_logo
By

४३६४३

अशोककुमार पांडेय यांना
जगन फडणीस पुरस्कार
रविवारी वितरण; ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः येथील पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा पत्रकार जगन फडणीस स्मृती पुरस्कार दिल्ली येथील इतिहास संशोधक, लेखक अशोककुमार पांडेय यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. २१) राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, विश्वस्त निशिकांत चाचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शोधपत्रकारितेचे जनक अशी जगन फडणीस यांची ओळख आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. पुरस्काराचे यंदाचे विसावे वर्ष आहे. श्री. पांडेय काश्मीरच्या इतिहासाचे आणि समकालीन घटनांचे विशेषज्ञ असून ‘द क्रेडिबल हिस्ट्री’ या चालू घडामोडी व ऐतिहासिक घटनांबाबत प्रबोधनात्मक विश्लेषण करणाऱ्या यू ट्यूब चॅनेलचे संचालन करतात. ‘काश्मीरनामा’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या सात आवृत्त्या निघाल्या असून ‘उसने गांधी को क्यों मारा?’ या संशोधनात्मक पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. ‘काश्मीर और काश्मिरी पंडित’, ‘सावरकर ः काला पानी के बाद’ ही त्यांची वाचकप्रिय पुस्तके आहेत. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यानिमित्ताने तुषार गांधी यांचे ‘गांधीजींच्या हत्येनंतर पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला ते हवेत का?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87632 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..