इचलकरंजीत मशाल पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत मशाल पदयात्रा
इचलकरंजीत मशाल पदयात्रा

इचलकरंजीत मशाल पदयात्रा

sakal_logo
By

इचलकरंजीत मशाल पदयात्रा

इचलकरंजी, ता. १७ ः १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अखंड भारत पुन्हा एकदा गतवैभवाने एकसंघ भारतमातेच्या छत्रछायेखाली यावा. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व भेदाभेद, जात-पात, पंथ-संप्रदाय, वर्णभेद विसरून अखंड भारत म्हणून एकत्रित आणण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे मशाल पदयात्रा छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढली.
पदयात्रेची सुरवात एकात्मता मंत्र व मशाल पूजनाने केली. सहायक पोलिस निरीक्षक (शहर वाहतूक) विकास अडसूळ, शिवाजी व्यास, लाहोटी, विजय पाटील यांच्याहस्ते मशालीचे पूजन केले. पदयात्रा मार्गस्थ होत असताना देशभक्तीपर जयघोषाने परिसर देशभक्तिमय बनला होता. पदयात्रेत वीर जवान रेस्क्यू फोर्सतर्फे मुख्य चौकाचौकांत लाठी-काठी व शूरता दाखवणारे कार्यक्रम घेतले. पदयात्रेच्या सांगतास्थळी अखंड भारताची संकल्पना काय आहे, अखंड भारत कसा होता. याविषयी माहिती राजेंद्र आलोने यांनी दिली. अखंड वंदे मातरम्‌ने पदयात्रेची सांगता गांधी पुतळा येथे केली. पदयात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद इचलकरंजीतर्फे केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87720 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..