...म्हणूनच महासत्तेच्या दिशेने वाटचाल; गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणूनच महासत्तेच्या दिशेने वाटचाल; गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी
...म्हणूनच महासत्तेच्या दिशेने वाटचाल; गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी

...म्हणूनच महासत्तेच्या दिशेने वाटचाल; गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी

sakal_logo
By

43720
नूल : सुरगीश्‍वर मठात झालेल्या कार्यक्रमात अक्काताई काळे यांचा सत्कार करताना गुरुसिद्धेश्‍वर महास्वामीजी. शेजारी अॅड. श्रीपतराव शिंदे, आप्पा काळे.

...म्हणूनच महासत्तेच्या दिशेने वाटचाल
गुरुसिद्धेश्‍वर महास्वामीजी; सुरगीश्वर मठातर्फे आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नींचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १७ : जगात सर्वत्र अशांततेचे वातावरण आहे; परंतु आपल्या देशामध्ये शांती टिकून आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संस्कृती आणि संस्कार रुजविण्यात यशस्वी ठरलो आहोत. शांती नांदल्यामुळेच आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, असे प्रतिपादन सुरगीश्‍वर मठाचे मठाधीश गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
येथील सुरगीश्‍वर मठामध्ये मठाधीश लिंगैकै श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजी-माजी जवानांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींच्या सत्कार केला. याप्रसंगी महास्वामीजी बोलत होते. श्री भगवानगिरी महाराज, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगवानगिरी महाराज म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यलढ्यात नूलच्या २७ स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. त्यांच्या पत्नींच्या सन्मानाचा कार्यक्रम प्रेरणादायी आहे.’’ अॅड. शिंदे म्हणाले, ‘‘कोणत्याही जातीपातीच्या आणि धर्माचा विचार न करता सर्व समाजाला एकत्र घेऊन दिशा दाखवण्याचे महान कार्य चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीने केले. या मठाची कीर्ती कर्नाटक आणि महाराष्ट्रात दूरपर्यंत पोहोचवली. त्यांच्या मागे येथील मठाची धुरा गुरुसिद्धेश्‍वर स्वामीजींनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे.’’
पुष्पा दरेकर यांनी स्वागत केले. मठाच्या शिष्य गणांनी वेद घोष आणि प्रार्थना केली. ११२ आजी-माजी सैनिक व चार स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नींचा सत्कार झाला. मधुरा थोरात, नागेश चौगुले, युवराज गायकवाड, रावसाहेब मुरगी यांची भाषणे झाली. अभिषेक पाटील, प्रा. अनिता चौगुले, जितेंद्र शिंदे, विनोद नाईकवाडी, रामगोंडा पाटील, अजित नडगदल्ली, चंद्रशेखर माळगी, राजशेखर यरटी, महेश तुरबतमठ आदी उपस्थित होते. संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. बसवराज आजारी यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, सकाळी चंद्रशेखर स्वामीजींच्या गदगीचे पूजन गुरुसिदेश्‍वर स्वामीजींच्या हस्ते झाले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी दर्शन घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87724 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..