जवानाच्या कुटुंबीयांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवानाच्या कुटुंबीयांना मदत
जवानाच्या कुटुंबीयांना मदत

जवानाच्या कुटुंबीयांना मदत

sakal_logo
By

43725
जरळी : देशपांडे कुटुंबीयांतर्फे गीता घुगरे यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करताना प्रतिभा देशपांडे. शेजारी विठ्ठल चौगुले, अजित कुलकर्णी, दत्ता देशपांडे आदी.

जवानाच्या कुटुंबीयांना मदत
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील उदय महादेव घुगरे या जवानाचा गेल्या महिन्यात पितोरागड (उत्तराखंड) येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या जवानाच्या कुटुंबीयांना माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. उदयच्या मृत्यूमुळे घुगरे कुटुंबीयांचा आधार हरपला आहे. उदयला शौर्य हा दीड वर्षाचा एकुलता मुलगा आहे. त्याच्या शिक्षणासाठी म्हणून देशपांडे कुटुंबीयांकडून आर्थिक मदत देण्यात आली. प्रतिभा देशपांडे यांच्या हस्ते ही मदत उदय यांची पत्नी गीता घुगरे यांच्याकडे सुपूर्द केली. दत्ता देशपांडे, टी. एम. दुंडगे, विठ्ठल चौगुले, महानंदा चौगुले, बाबासाहेब पाटील, अजित कुलकर्णी, आप्पासाहेब जाधव, राजेंद्र शेलार, महादेव घुगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87728 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..