शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड
शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड

शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड

sakal_logo
By

43737
प्रा. चेतन रावळ
43738
प्रा. प्रवीण थोरात
-------------------
शरद पॉलिटेक्निकला ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ ॲवॉर्ड
गोव्यात २७ तारखेला होणार प्रदान; दोन प्राध्यापकांचाही होणार सन्मान
दानोळी, ता. १७ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) कडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ ॲवॉर्ड जाहीर झाला आहे. त्याचबरोबर शरद पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. चेतन रावळ यांना ‘बेस्ट फॅकल्टी फॉर एक्सलंट कॉन्ट्रिब्युशन इन आएसटीई अॅक्टिव्हिटी’ तर डीन प्रा. प्रवीण थोरात यांना ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गोवा येथील अग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईन कॉलेजमध्ये २७ ऑगस्टला होणाऱ्या ५१ व्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा ॲवॉर्ड देण्यात येणार आहे.
‘शरद पॉलिटेक्निक’ने फॅकल्टी डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, इंडक्शन प्रोग्रॅम, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, क्विझ कॉम्पिटिशन असे विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर प्रा. रावळ यांनी त्यांच्या विभागामध्ये विविध अॅक्टिव्हिटी राबवल्या आहेत. प्रा. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सोलर बेसड व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टिम’ हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या ‘शरद पॅटर्न’, व्हॅल्यू एडेड प्रोग्रॅम, प्रोजेक्ट बेसड् लर्निंग, यूजी फेलोशिप, तसेच इनोव्हेशन सेंटर, शरद स्टार्टअप सेंटर, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी सातत्याने अॅक्टिव्हिटीचे आयोजन यांचे परीक्षण करुन या ॲवॉर्डसाठी निवड केली आहे.
‘आयएसटीई’च्या ॲवॉर्डसाठी निवड म्हणजे शैक्षणिक संस्थेने केलेल्या कार्याचा उचित गौरव असल्याचे मत संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87747 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..