शहाजी महाविद्यालयात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहाजी महाविद्यालयात कार्यक्रम
शहाजी महाविद्यालयात कार्यक्रम

शहाजी महाविद्यालयात कार्यक्रम

sakal_logo
By

स्वातंत्र्यवीरांचे रोज स्मरण
व्हावे : डॉ. व्ही. एन. शिंदे
कोल्हापूर, ता. १९ : ‘‘स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचे रोज स्मरण व्हावे. त्यांच्या त्यागावरच देश स्वतंत्र झाला. त्यामुळेच आपण आजादी का अमृतमहोत्सव साजरा करू शकत आहे,’’ असे शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्रामवर आधारित चित्र, माहिती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य डॉ. शानेदिवाण म्हणाले, ‘‘शहाजी महाविद्यालयने आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले. ’’
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, सचिव विजयराव बोंद्रे, इतरांचे उपक्रमास प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे प्रतिनिधी विठ्ठल आमले, इतर शाखांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाजी ग्रंथालय, इतिहास विभाग प्रमुख, सांस्कृतिक विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग, इतर विभागांनी उपक्रमांचे आयोजन केले. डॉ विजय देठे, डॉ. के. एम. देसाई, डॉ. प्रशांत पाटील यांनी संयोजन केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिखरे यांनी स्वागत केले. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87781 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..