विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता
विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

sakal_logo
By

विद्यापीठ लोगो
-
43781
--
सर्व दुरस्थ अभ्यासक्रमांना मान्यता
-
डॉ. मोरे; तीन जिल्ह्यांतील ८१ अभ्यास केंद्रांत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

कोल्हापूर, ता. १७ : ‘‘शिवाजी विद्यापीठाच्या दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली. विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश प्रक्रियेस लवकरच प्रारंभ होईल,’’ अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी दिली.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.
ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील ८१ अभ्यास केंद्रांत विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार, बंदिजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येईल.
विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in संकेतस्थळावर Distance Education लिंकवर प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा. एमबीए अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच झाली असून, त्यामधील पात्र उमेदवारांना प्रवेश देण्याची कार्यवाही लवकर होत आहे, याचीही नोंद घ्यावी.’
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःचा युजर आयडी, पासवर्ड तयार करून नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्याने निवडलेले अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते, याचीही नोंद घ्यावी. प्रथम वर्षाचा ऑनलाइन अर्ज नव्याने सादर करताना ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी बॅंकेची कागदपत्रे (पासबुक, डेबिट/क्रेडिट कार्ड, युपीआय/खाते क्रमांक/आयएफएससी कोड) बरोबर ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यासकेंद्रावर जमा करण्याची मुदत शुल्कासह १५ ऑक्टोबरपर्यंत आहे.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विविध अधिकार मंडळांचे सहकार्य लाभले.


चौकट
वंचित विद्यार्थ्यांना संधी
दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून आता मान्यता मिळाल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी, अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अगर काही कारणांनी ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, अशा व्यक्तींनी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.
...

केंद्राची वैशिष्ट्ये
*१२ प्रोग्राम्सअंतर्गत विविध अभ्यासक्रम
*दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध
*२ विभागीय केंद्रे, ८१ अभ्यासकेंद्रे, दुर्गम भागांचाही समावेश
*अभ्यासकेंद्रांत संपर्कसत्रांचे आयोजन
*विद्यार्थ्यांना विषयतज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन
*ऑनलाईन व्हिडिओ मार्गदर्शन सत्रांचाही समावेश
*विद्यार्थ्यांना नेट/सेट तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87803 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..