गडहिंग्लज परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
गडहिंग्लज परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

गडहिंग्लज परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

sakal_logo
By

महागाव परिसर
महागाव : परिसरातील हुनगिनहाळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच दयानंद गुंडली यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी उपसरपंच दयानंद कांबळे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. वैरागवाडी ग्रामपंचायतीमध्ये अनिता सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सरपंच लता सुतार, उपसरपंच इंद्रायणी पाटील, पी. के. पाटील उपस्थित होते. मासेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रोहिणी विजय रेडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्या मंदिर मासेवाडीमध्ये जोतिबा रामचंद्र टक्केकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
------------------
चिंचणेत सैनिकांच्या वारसांचा सत्कार
चंदगड : तालुक्यातील चिंचणे या छोट्या गावातील दहा स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांच्या वारसांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या. यावेळी सरपंच संतोष पाटील, उपसरपंच किरण पाटील, पोलिसपाटील बाळू व्हंकळी, ग्रामसेवक दत्तात्रय नाईक, सदस्य सागर चिंचणेकर, कल्याणी पाटील, प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------
गवसे परिसर
आजरा : वेळवट्टी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मनीषा देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित देसाई, ग्रामसेवक संदीप चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत गवसे व बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे येथे सरपंच सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) माजी सैनिक आनंदा शेटगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. केंद्रीय मराठी शाळेत माजी विद्यार्थिनी श्‍वेता पवार, वैष्णवी पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य सेविका शिल्पा साठे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
------------------
किणी परिसर
कोवाड : किणी येथील जयप्रकाश विद्यालयात मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नागरदळे येथील नागनाथ हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. एस. मन्नूरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87816 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..