नूल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
नूल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

नूल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

sakal_logo
By

नूल परिसर
नूल : नूलसह परिसरातील विविध गावांत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. येथील ग्रामपंचायतसमोर दहावीत प्रथम आलेल्या कविता रवंदी व श्रेया पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा नडगदल्ली, रामलिंग हायस्कूलमध्ये उमेश खोत, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल नेवडे, शिवपार्वती दूध संस्थेत अध्यक्ष पी. एम. चव्हाण, लक्ष्मी पतसंस्थेत अध्यक्ष बाबूराव मास्तोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
मुगळी : येथील ग्रामपंचायतीसमोर सरपंच बी. जी. स्वामी, अवधूत सेवा संस्थेत सुभद्रा जाधव, लक्ष्मी पतसंस्थेत अध्यक्ष बाबासाहेब पाटील, हनुमान दूध संस्थेत अध्यक्ष सोमगोंडा पाटील, किसान दूध संस्थेत अध्यक्ष रमेश आरबोळे, गजानन दूध संस्था आणि अष्टविनायक सेवा संस्थेत अध्यक्ष निंगाप्पा माने, सोमलिंग सेवा संस्थेत अर्जुन जाधव, महात्मा गांधी वाचनालयात अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
जरळी : येथील ग्रामपंचायतीसमोर सरपंच सागर पाटील, जरळी हायस्कूलमध्ये दत्ता देशपांडे, प्राथमिक शाळेसमोर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, काडसिद्धेश्वर पतसंस्थेत अध्यक्ष बी. डी. पट्टेकरी, दत्त दूध संस्थेत उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, सिद्धेश्वर सेवा संस्थेत अध्यक्ष ऋषिकेश पाटील, बलभीम दूध संस्था व बाळूमामा मंदिरासमोर वीरपत्नी गीता घुगरे, विठ्ठल रुक्माई पतसंस्थेत अध्यक्ष अप्पासाहेब जाधव, उमा महेश्वर पतसंस्थेत अध्यक्ष शिवगोंडा देसाई, सिद्धेश्वर दूध संस्थेत रमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जवान प्रकाश कुरळे, किल्ले सामानगड दूध संस्थेत अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
खणदाळ : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक गणपती चौथे, शंकरलिंग सेवा संस्थेत अध्यक्ष संजय जाधव, ग्रामपंचायतीसमोर अश्विनी पाटील, लक्ष्मी दूध संस्थेत तात्यासाहेब कोनुरी, प्राथमिक शाळेत बारावीत प्रथम आलेला आकाश गोटुरी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व कमलेश्‍वर दूध संस्थेत सरपंच बसवराज आरबोळे, कडलगे हायस्कूलमध्ये आनंद जाधव, ग्रामपंचायतीसमोर सरपंच अक्काताई नाईक यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87833 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..