पावसाची उघडीप : शेतकऱ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची उघडीप : शेतकऱ्यांना दिलासा
पावसाची उघडीप : शेतकऱ्यांना दिलासा

पावसाची उघडीप : शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By

०१७५८


जिल्ह्यात पावसाची उघडीप
---
शेतकऱ्यांना दिलासा; राधानगरीचा एक दरवाजा बंद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. आज बराच काळाने सूर्यदर्शन झाले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने कमी होत आहे. रात्री पंचगंगा नदीची पातळी ३१ फूट पाच इंचापर्यंत खाली आली. तर, राधानगरीचा सुरू असलेला एक दरवाजा बंद झाला. सध्या धरणातून ३०२८ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. दहा ते पंधरा मिनिटांचा तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण उघडीप राहिली. नद्यांचे पाणीही ओसरू लागल्याने पाण्याखाली गेलेला ऊस किंवा इतर पिके बाहेर येत आहेत. उसाला फारसा फटका बसलेला नाही. मात्र, भुईमूग, भात, सोयाबीन पिकांची अजूनही काळजी करावी लागण्यासारखे चित्र आहे. सायकांळपर्यंत २७ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाने अशीच उघडीप दिली, तर आणखी काही बंधाऱ्यांवरील पाणी कमी होऊन रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील. ज्या ठिकाणी पाणी आले होते, त्या ठिकाणच्या शेतींचे पंचनामे केले जात आहेत. तसेच, ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचे नियोजनही कृषी विभागाकडून केले आहे.

* धरणातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये :
धरण* एकूण साठवणूक क्षमता* आजचा पाणीसाठा* टक्केवारी
*राधानगरी*८.३६*८.३०*९९.३०
*दूधगंगा*२५.३९*२२.८१*८९.६९
*वारणा*३४.३०*३०.८५*८९.६७
*तुळशी *३.४०*३.३६*९६.८५
* अलमट्टी*१२३* ११०* -* ९०

या ठिकाणी जोरदार पाऊस :
राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्‍यात मात्र जोरदार पावसाने हैराण केले आहे. पाणलोट क्षेत्रातील होणाऱ्या पावसामुळे धरणांची पातळी कमी होण्याऐवजी स्थिर राहत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87863 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..