विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा, भडगाव ग्रामस्थांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा, भडगाव ग्रामस्थांची मागणी
विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा, भडगाव ग्रामस्थांची मागणी

विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा, भडगाव ग्रामस्थांची मागणी

sakal_logo
By

43817
भडगाव : शाळा क्रमांक दोनकडे जाणाऱ्या रस्ता करण्याच्या मागणीचे निवेदन राजाराम घेवडे यांना देताना वसंत नाईक, दयानंद पट्टणकुडी, अश्करअली मुल्ला आदी.

विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा
ग्रामस्थांची मागणी; भडगाव ग्रामपंचायतीला दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : भडगाव (ता. गडहिंग्लज) शाळा क्रमांक दोनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दोन किलोमीटरचा रस्ता चिखलमय झाला आहे. विद्यार्थ्यांना अक्षरश: ओढ्यातून शाळेला जावे लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी तरी रस्ता करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीला मागणीचे निवेदन दिले आहे.
भडगाव पैकी इजिमा क्रमांक १२२ पासून राजमाने वसाहत, मुकनारवाडी, कोरेकोडोली वसाहत, घोलराखे तळ ते इजिमा १२३ ला मिळणारा रस्ता, वीरभद्र मंदिर, मुकनारवरवाडी ते बालाजी मंदिरपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, भाजीपाला विक्रीला जाणारे व्यावसायीकासह शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरुन दुचाकी, चारचाकी वाहन जाणे मुश्किल आहे. रात्री-अपरात्री रुग्णाला घेऊन जाण्याची वेळ आल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. ग्रामपंचायतीचे वारंवार लक्ष वेधूनही रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासनाकडून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे सांगितले जाते. मग रस्ता का होत नाही असा प्रश्‍न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी राजाराम घेवडे यांनी निवेदन स्वीकारले. वसंत नाईक, मल्लिकार्जुन चौगुले, दयानंद पट्टणकुडी, अश्करअली मुल्ला, लक्ष्मण करगुप्पी, शंकर देसाई, सुरेश घुगरे, सचिन कौजलगी, रमेश कौजलगी, मारुती कौजलगी, बाळु घुगरे, आप्पासाहेब चाळुगोळ, आपय्या करगुप्पी, केंपाना करगुप्पी, शिवाजी घुगरे, रुद्राप्पा कौजलगी, संजय कुरबेट्टी, महालिंग कुरबेट्टी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87865 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..