बॅंकाकडून उद्योगांसाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य; गणेश गोडसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंकाकडून उद्योगांसाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य; गणेश गोडसे
बॅंकाकडून उद्योगांसाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य; गणेश गोडसे

बॅंकाकडून उद्योगांसाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य; गणेश गोडसे

sakal_logo
By

43842
आजरा : येथील तहसीलदार कार्यालयात विविध स्टॉलची माहिती घेताना प्रातांधिकारी वसुंधरा बारवे. या वेळी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे व अन्य अधिकारी.

बॅंकाकडून उद्योगांसाठी
सर्वतोपरी आर्थिक सहकार्य
गणेश गोडसे; आजऱ्यात उद्योजक, नवउद्योजकांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १७ : शासकीय योजनांचा लाभ उद्योजक व नवउद्योजकांनी घ्यावा. कागदपत्रे व आवश्यक गोष्टींची पुर्तता केल्यास उद्योगांना बॅंकाकडून सर्वतोपरी आर्थिक सहकार्य केले जाईल. उद्योगधंदे वाढवणे व त्यांना बळ देणे यासाठीच शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे अग्रणी बॅंकचे प्रबंधक गणेश गोडसे यांनी स्पष्ट केले.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात आज उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. आजरा भुदरगडच्या प्रातांधिकारी वसुधंरा बारवे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. वेगवेगळ्या महामंडळ व बॅंकाचे पंचवीस स्टॉल येथे मांडले होते. शासकीय योजनांचा माहितीची परिपत्रक मांडली होती. याला चांगला प्रतिसाद लाभला.
प्रांताधिकारी बारवे म्हणाल्या, ‘‘शासनाच्या विविध योजनांचा लाभ बेरोजगार तरुण, नवउद्योजक व उद्योजकांना व्हावा यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी विविध महामंडळ व बॅंकाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा.’’ या वेळी आर्थिक साक्षरता कार्यक्रम समन्वयक उद्यकुमार जोशी, जिल्हा बॅंकेचे आजरा तालुका विभागीय अधिकारी सुनिल दिवटे यासह राष्ट्रीयकृत बॅंकाचे अधिकारी यांनी बॅंकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या वेळी नायब तहसीलदार डी. डी. कोळी म्हणाले, ‘‘इच्छुकांनी कागदपत्रांची पुर्तता करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तालुक्यात शंभर उद्योजक तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’’ तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण कांबळे, तालुका आर्थिक समावेशक एस. बी. कांबळे, विविध बॅंकाचे शाखाधिकारी, अधिकारी या वेळी उपस्थित होते.
--------------
चौकट
बचत गटाचा स्टॉल लक्षवेधी
या वेळी संस्कृती महिला ग्रामसंघ व दुर्गा महिला बचत गट यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. हे स्टॉल लक्षवेधी ठरले. अनेकांनी या स्टॉलला भेट देवून विविध पदार्थांची खरेदी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87906 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..