खेळाडूंचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडूंचा गौरव
खेळाडूंचा गौरव

खेळाडूंचा गौरव

sakal_logo
By

नवोदित खेळाडू, प्रशिक्षकांना
रविवारी गौरवः रवींद्र उबेराय

कोल्हापूर, ता. १७ ः येथील विजयकुमार फॅमिली ट्रस्‍टतर्फे रविवारी (ता. २१)जिल्ह्यातील विविध खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवोदित खेळाडू व प्रशिक्षकांना गौरव करण्यात येणार आहे. येथील हॉटेल ॲट्रीयामध्ये सायंकाळी पाच वाजता प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे प्रमुख उपस्थित व संचालक अरुण नरके अध्यक्षस्थानी आहेत. जवळपास बारा लाख रुपयांचा निधी जवळपास वीस खेळाडूंना देण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचा लौकिक वाढवावा त्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम घेण्यात येत आहे, अशी माहिती विश्वस्त रवींद्र उबेराय पत्रकार परिषदेत दिली.
गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, क्रिकेटर अभिषेक निषाद, संजना वाघमारे, फुटबॉल ऋषीकेश पाटील, प्राविण माळी, समालोचक विजय साळुंखे, बॅडमींटन पट्टू जाणव्ही कानिटकर, टेनिस पट्टू एश्वर्या जाधव, कुस्ती पट्टू पैलवान पृथ्वीराज पाटील, तुषार पाटील नेमबाजी शाहू माने, एअर पिस्टल नेमबाज जाणकी मोकाशी, रब्बी वैष्णवी पाटील, फेनिसिंग ज्योती सुतार, हॉकी पट्टू शेवंता पाटील , रमा पोतणीस, वेटलेप्टर निकिता कमलाकर या खेळाडूंचा गौरव होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87921 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..