विमानतळ भूसंपादनासाठी-५२ कोटी - धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ भूसंपादनासाठी-५२ कोटी - धनंजय महाडिक
विमानतळ भूसंपादनासाठी-५२ कोटी - धनंजय महाडिक

विमानतळ भूसंपादनासाठी-५२ कोटी - धनंजय महाडिक

sakal_logo
By

फोटो महाडिक

विमानतळाच्या भूसंपादनासाठी
५२ कोटी ७२ लाखाचा निधी

खासदार महाडिक ; शिंदे, फडणवीस यांच्याकडून लोकहिताचे निर्णयाचा धडाका

कोल्हापूर, ता. १७ ः विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून ५२ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच लोकहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाचे प्रश्‍न सुटण्यासाठी, केंद्र आणि राज्य स्तरावर पाठपुरावा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज राज्य शासनाने विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५२ कोटी ७२ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग केला. त्याबद्दलचा शासकीय अध्यादेशही आज प्रसिध्द झाला.
शिंदे -फडणवीस सरकारने सत्तेवर येताच, कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रत्यक्ष निधी देवून, क्रियाशिलता दाखवून दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हा निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे.
----------
मंत्री जोतिरादित्य सिंदीया
३ सप्टेंबरला कोल्हापुरात
दरम्यान ३ सप्टेंबरला केंद्रीय विमान उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंदीया कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापूर विमानतळाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. लवकरच कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि हवाई सेवेला भरारी मिळेल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87934 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..