राष्ट्रगीत गायन उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रगीत गायन उपक्रम
राष्ट्रगीत गायन उपक्रम

राष्ट्रगीत गायन उपक्रम

sakal_logo
By

43652

सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम
शहरासह जिल्ह्यात उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत आज शहर आणि जिल्ह्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम उत्साहात साजरा झाला. सर्व शासकीय, खासगी आस्थापना, शाळा- महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांबरोबरच सार्वजनिक ठिकाणीही सकाळी अकराला स्तब्ध झाली आणि सर्वत्र राष्ट्रगीत गायन झाले. दरम्यान, यानिमित्त सर्वत्र राष्ट्रभक्तीचा माहोल अनुभवायला मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उपक्रमावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके आदी उपस्थित होते.
शहरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह शहरातील धार्मिक स्थळे, ऐतिहासिक बिंदू चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, शिवाजी विद्यापीठ, महापालिका आदी ठिकाणीही हा उपक्रम झाला. खासगी आस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपापल्या आस्थापनांमध्ये राष्ट्रगीत गायन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87937 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..