स्‍वाईन फ्‍ल्यूच्या रुग्‍णांचे शतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍वाईन फ्‍ल्यूच्या रुग्‍णांचे शतक
स्‍वाईन फ्‍ल्यूच्या रुग्‍णांचे शतक

स्‍वाईन फ्‍ल्यूच्या रुग्‍णांचे शतक

sakal_logo
By

स्‍वाईन फ्‍लूच्या रुग्‍णांचे शतक
१२ रुग्‍णांचा मृत्यू; ४७ रुग्‍णांवर उपचार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १७ :जिल्‍ह्यात स्‍वाईन फ्‍लूच्या रुग्‍णांची संख्या वाढत चालली आहे. मागील आठ महिन्यांत जिल्‍ह्यात स्‍वाईन फ्‍लूचे ११२ रुग्‍ण आढळले आहेत. यातील १२ रुग्‍णांचा मृत्यू झाला असून, ४७ रुग्‍णांवर उपचार झाले आहेत. ५३ रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार केले आहेत. सर्वाधिक रुग्‍ण हे कोल्‍हापूर महापालिका क्षेत्रातील आहेत. हा आजार श्‍‍वसननलिकेत होणार संसर्ग आहे. या आजाराची लक्षणे ही सामान्य तापासारखीच असल्याने रुग्‍णांनी तत्‍काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.
स्‍वाईन फ्‍लू हा इन्‍फलूएन्‍झा टाईफ ए च्या एचवनएनवन विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्‍फुसातील पेशींना संक्रमित करतो. या विषाणूचे शरीरात संक्रमण झाल्यानंतर एक ते सात दिवसांच्या कालावधीत रुग्‍ण स्‍वाईन फ्‍लूने संक्रमित होतो. हा आजार संसर्गजन्य असल्याने संपर्कातील व्यक्‍तींनाही तो बाधित करत असल्याने रुग्‍णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे स्‍वाईन फ्‍लूने बाधित व्यक्‍तीचा खोकला, शिंक किंवा या व्यक्‍तीने स्‍पर्श केलेल्या वस्‍तूंचा संपर्कात आल्याने डोळे, नाक किंवा तोंडावाटे हा आजार पसरतो. या आजारात ताप, थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा येणे, डायरिया व उलट्या होतात. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तत्‍काळ वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87946 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..