जिल्हाधिकारी कार्यालयला राष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी कार्यालयला राष्ट्रीय पुरस्कार
जिल्हाधिकारी कार्यालयला राष्ट्रीय पुरस्कार

जिल्हाधिकारी कार्यालयला राष्ट्रीय पुरस्कार

sakal_logo
By

43865

जिल्हाधिकारी कार्यालयाचा
स्कॉच पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर, ता. १७ : राष्ट्रीय पातळीवरील नामांकित स्कॉच या संस्थेकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयला सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी पुरस्कार स्वीकारला.
कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनप्राधिकरणातर्फे २०२१ मध्ये जिल्ह्यात राबविण्यात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले. यासाठी सार्वजनिक उद्घोषणाप्रणाली या प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवरील ‘स्कॉच'' नामांकित संस्थेने प्रशासकीय पातळीवर अभिनव प्रकल्प राबविल्याबद्दल स्कॉच पुरस्काराने सन्मानित केले आहे. आज या संस्थेने ऑनलाइन बैठकीत हा पुरस्कार प्रदान केला. जिल्ह्यातील ६१५ ठिकाणी ही यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेच्या मदतीने गावागावात संपर्क साधता येणे शक्य झाले. मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्तीत जनसामान्यांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविणे कोणत्याही आपत्ती संबंधातील सूचना देणे शक्य झाले. महापालिका व  पोलीस प्रशासन यांनी वेगवेगळ्या चार पुरस्कार प्रकारात सहभाग घेतला होता. जिल्ह्याच्या या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीला अंतिम पुरस्कारामध्ये सिल्वर कॅटेगरीमध्ये पूरस्कार प्रदान केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून प्रसाद संकपाळ यांनी पूरस्कार स्वीकारला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87947 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..