अस्वलाने हल्ला केल्याचा जखमी शेतकऱ्याचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्वलाने हल्ला केल्याचा
जखमी शेतकऱ्याचा दावा
अस्वलाने हल्ला केल्याचा जखमी शेतकऱ्याचा दावा

अस्वलाने हल्ला केल्याचा जखमी शेतकऱ्याचा दावा

sakal_logo
By

43880
जखमी प्रकाश भालेकर

अस्वलाने हल्ला केल्याचा
जखमी शेतकऱ्याचा दावा
वनविभाग मात्र साशंक; तांब्याचीवाडीत घटना

सकाळ वृत्तसेवा
कडगाव, ता. १७ ः अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा तांब्याचीवाडी (ता. भुदरगड) येथील प्रकाश महादेव भालेकर यांनी आज केला. ते जखमी असून त्यांच्या हातापायाला जखमा आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी दहाच्या दरम्यान तांब्याच्यावाडीजवळील जंगल परिसरात घटना घडली. गुरांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे अस्वल पळून गेले आणि जीवघेण्या हल्ल्यातून भालेकर बचावले, असा दावाही त्यांच्या नातेवाईकांनी केला; मात्र प्रथमदर्शनी हा हल्ला अस्वलाने केल्याचे आढळले नसल्याचे वनक्षेत्रपाल अशोक वाडे यांनी सांगितले.
जखमींच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी ः तांब्याचीवाडीसह सिंधाचा डोंगर परिसर जंगलपट्ट्यात येतो. सकाळी दहाच्या सुमारास भालेकर जनावरांना घेऊन चरण्यासाठी गेले होते. जनावरे चरत असताना पूर्ण वाढ झालेल्या अस्वलाने झाडीतून पाठीमागील बाजूने भालेकर यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी भालेकर यांनी हातातील काठीने प्रतिकाराचा प्रयत्न केला; मात्र उपयोग झाला नाही. यावेळी झालेल्या ओरड्यामुळे भालेकर यांनी चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी अस्वलावर प्रतिहल्ला केला. यात एका म्हशीसह अन्य काही जनावरेही जखमी झाली. जनावरांच्या प्रतिहल्ल्यामुळे अस्वलाने तेथून पळ काढला आणि जीवघेण्या हल्ल्यातून भालेकर यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना सीपीआरमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्या हातावर आणि छातीवर उपचार झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

रुग्णालयाच्या अहवालानंतरच पुढील तपास
वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी अस्वलाने हल्ला केल्याचे निदर्शनास आले नसल्याचे वनक्षेत्रपाल अशोक वाडे यांनी सांगितले. याबाबत रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल, असेही ते म्हणाले. पंचनाम्यावेळी वनपाल एल. जे. डिसोझा, किरण पाटील, वनरक्षक एस. डी. बेडगे, विजय शिंदे, उपसरपंच बाजीराव कांबळी, अशोक भालेकर, रामचंद्र भालेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87967 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..