येई गणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येई गणेशा
येई गणेशा

येई गणेशा

sakal_logo
By

लोगो- येई गणेशा
-
43873

विशेष मुलांनी साकारलेल्या
इकोफ्रेंडली मूर्तींना मागणी

हिरेन हमलाईची मूर्ती दुबईला रवाना

कोल्हापूर, ता. १७ ः शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष मुलांनी साकारलेल्या इकोफ्रेंडली मूर्तींना यंदाही मागणी वाढली आहे. चेतना विकास मंदिर, स्वयम मतिमंद मुलांची शाळा, जिज्ञासा शाळेसह विविध शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून इकोफ्रेंडली मूर्ती साकारल्या आहेत. चेतना विकास मंदिर शाळेतील मुलांनी साकारलेली एक मूर्ती आज दुबईला रवाना झाली. हिरेन हमलाई यांनी ही मूर्ती घेतली.
विशेष मुलांच्या शाळांतील उद्योग व व्यवसाय केंद्रांतून या मुलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यातूनच गेल्या काही वर्षात या मुलांच्या मूर्तींना मागणी वाढत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मूर्तीबरोबरच पूजेच्या साहित्याचे कीटही आता हे विद्यार्थी तयार करत आहेत. त्यातून त्या त्या संस्थेबरोबरच या मुलांनाही आर्थिक बळ मिळत आहे.
चेतना विकास मंदिर शाळेचे कार्याध्यक्ष पवन खेबूडकर म्हणाले, ‘‘शाळेतील मुले गेली अनेक वर्षे कागदाच्या लगद्यापासून घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठीही मूर्ती साकारतात. बारा इंचापासून पाच फुटापर्यंतच्या विविध रूपातील मूर्ती यंदाही या मुलांनी साकारल्या असून, बुकींगला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. परदेशातील काही भाविकांनाही या मूर्तींची भुरळ असून, मित्र किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून हवाई मार्गाने अगदी सुरक्षितपणे मूर्ती रवाना केल्या जातात.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87973 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..