पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

43879

इचलकरंजी ः शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना प्रशासक सुधाकर देशमुख. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी विकास खरात, उपायुक्त प्रदीप ठेंगल. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

प्रशासक देशमुख; शहापूर खाणीत मूर्ती विसर्जन करण्याचे मंडळांना आवाहन

इचलकरंजी, ता. १७ ः शहरात २०१६ पासून शहापूर खाणीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास सुरुवात केली. हे एक शहराने पुढे टाकलेले पाऊल आहे. याबाबत प्रशासन वेगळा निर्णय घेऊ शकत नाही, तर न्यायालयाचे आदेश आणि शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी इचलकरंजीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केले. येथील घोरपडे नाट्यगृहात शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी श्री. देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले की, आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यापूर्वी कोणकोणत्या उपाययोजना केल्या होत्या, याचा अभ्यास करून पुढील नियोजन करण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला गळती लागत असते. अशावेळी शहराला पंचगंगा नदीतून पूर्ण क्षमतेने पाणी घेऊ शकत नाही. कारण ते पाणी शहरवासीयांना नको असते, याचाही विचार करण्याची गरज आहे.
पूर्वतयारीचा आढावा शहर अभियंता संजय बागडे यांनी घेतला. कृत्रिम कुंडासह विसर्जन मार्गाच्या रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी महावितरणकडून केलेल्या तयारीची माहिती दिली. अर्ज केल्यास मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा देण्याबाबत कार्यवाही करण्याची त्यांनी हमी दिली.
मंडळांतर्फे तानाजी पोवार, बाळासाहेब कलागते, मलकारी लवटे, संतोष कांदेकर, समीर मुदगल, प्रसाद जाधव, मोहन मालवणकर, शहाजी भोसले, आनंदा मकोटे, पुंडलिक जाधव, नितीन कटके, सचिन सुतार आदींनी भूमिका मांडली. कायदा व व्यवहार यांची सांगड घालून विसर्जनाबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी विकास खरात, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संवाद साधला. उपायुक्त प्रदीप ठेंगल, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते. नगरसचिव विजय राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. अपर तहसीलदार शरद पाटील यांनी आभार मानले.
-------------------------
ध्वनी प्रदूषण टाळा; गायकवाड
अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड म्हणाल्या की, सण-उत्सवात शासनाच्या नियमावलीचे पालन करून इचलकरंजीने आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वीच शहराचे नाव संवेदनशील यादीत आहे. त्यामुळे उत्साहाच्या भरात कोणतीही कृती करणे टाळावे. गणेशोत्सव कालावधीत पूर्ण क्षमतेने सीसीटीव्ही सुरू असतील. ध्वनी प्रदूषण टाळावे. आवाजाची मर्यादा पाळल्यास कारवाई केली जाणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87982 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..