१०२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०२
१०२

१०२

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठात
परीक्षेच्या निकालावरून गोंधळ
कोल्हापूर, ता. १७ : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षा सुरू आहेत. त्यापैकी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेने अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, परीक्षा देवूनही विद्यार्थी अनुपस्थित व शून्य गुण मिळाल्याचे स्पष्ट होताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. विद्यापीठाकडे तक्रार येताच जिल्हयातील सर्व महाविद्यालयाकडून संबंधीत विद्यार्थ्याची माहिती मागवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसात निकालात दुरुस्ती करून पुन्हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली. पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षण किंवा नोकरीचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून अंतिम वर्षाचा निकाल विद्यापीठाने तातडीने जाहीर केला आहे. मात्र, इंग्रजी, विज्ञान, गणित, संख्याशास्त्रासह अन्य विषयांच्या १० टक्के विद्यार्थ्यांच्या निकालात चुका झाल्या आहेत, अशा तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87987 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..