उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार युवराज पाटील यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार युवराज पाटील यांना प्रदान
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार युवराज पाटील यांना प्रदान

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार युवराज पाटील यांना प्रदान

sakal_logo
By

43885
-----------
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
युवराज पाटील यांना प्रदान

नृसिंहवाडी, ता. १८ ः शिरोळच्या कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनतर्फे ‘सकाळ’चे दानोळी बातमीदार युवराज पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान केला. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने, चिमासाहेब जगदाळे कॉलेजचे मुख्य विश्वस्त धनाजीराव जगदाळे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान केला.
शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. आदर्श समाजरत्न पुरस्काराने सुरेश सासणे, विश्वास बालिघाटे, वीरस्वामी तुपदळे, कर्तवनिष्ठ पुरस्काराने रोहित डावाळे, अमर फडतारे, कृषिभूषण पुरस्काराने राजकुमार नकाते, आदर्श शिक्षकरत्न दत्तात्रय आंधळे यांना गौरवले. नवे पर्व विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. कलाविश्व रंगभूमी संस्थेचे संस्थापक दगडू माने यांनी स्वागत करून मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते माहिती अधिकार मार्गदर्शक शाहीन शेख यांनी माहिती अधिकाराबाबत विचार मांडले. प्रशासकीय महाविद्यालयाचे संचालक बाबासाहेब आरसगोंडा, विनोद पुजारी, दत्तात्रेय आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, राजेंद्र दाभाडे, कृष्णा लोहार आदी उपस्थित होते. ऋचा माळकर यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब भोसले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88001 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..