सुयशचे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुयशचे पुरस्कार जाहीर
सुयशचे पुरस्कार जाहीर

सुयशचे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

44061
सुवर्णा पोवार, अर्चना पाटील, युनूस लाडजी, संतोष शिवणे.

सुयशचे पुरस्कार जाहीर
चौघांचा सन्मान; आज वितरण
आजरा, ता. २२ : येथील सुयश शिक्षण शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष पी. एम. आजगेकर यांनी जाहीर केले. सुशय शिक्षक संस्था व प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत पुरस्कार विजेत्या शिक्षकांची निवड केली. अनुक्रमे संतोष शंकर शिवणे (कुमार विद्यालय, उत्तूर), सुवर्णा वसंत पोवार (विद्यामंदिर, मडिलगे), युनूस महंमद शेख लाडजी (उर्दू विद्यामंदिर, आजरा), अर्चना सुनील पाटील (विद्यामंदिर, शेळप) यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ...... होणार आहे.
शिक्षकांचे एकूण सेवेतील शैक्षणिक कार्य, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविणे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतील योगदान यांचा विचार करून निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सुयशचे संस्थापक जनार्दन निऊंगरे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस, सरचिटणीस रवींद्र दोरुगडे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, सुयश संचालक शिवाजी गिलबिले, सुभाष केसरकर, कृष्णा खाडे, महादेव तेजम, विश्‍वास येजरे, पांडुरंग सुकवे, रामतीर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चौगुले, उपाध्यक्ष दशरथ कांबळे, संचालक शिवाजी बोलके, रवींद्र नावलकर, संजय शिवणे, सुचिता लाड, सुरेखा घाटगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88207 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..