मुत्नाळ प्रशालेच्या प्राचार्यपदी शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुत्नाळ प्रशालेच्या प्राचार्यपदी शिंदे
मुत्नाळ प्रशालेच्या प्राचार्यपदी शिंदे

मुत्नाळ प्रशालेच्या प्राचार्यपदी शिंदे

sakal_logo
By

मुत्नाळ प्रशालेच्या प्राचार्यपदी शिंदे
गडहिंग्लज : मुत्नाळ येथील एस. डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्यपदी व्ही. एस. शिंदे यांची नियुक्ती करण्यत आली. त्यांनी एनएमएमएस, जवाहर नवोदय परीक्षा, शिष्यवृत्तीसह इतर स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नियुक्तीबद्दल श्री. शिंदे यांचा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सचिव अ‍ॅड. बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
-----------------------------------------------

सर्वोदयमध्ये सायन्स विषयावर चर्चासत्र
गडहिंग्लज : येथील सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूलमध्ये माता-पालक संघातर्फे सणवार व सायन्स या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. रोपाला जलार्पण करून चर्चासत्राचे उद्‍घाटन झाले. श्रीमती रजनी हिरळीकर प्रमुख पाहुण्या होत्या. चातुर्मासाचे महत्त्व सांगताना सणवार व सायन्स या विषयाशी सांगड घालून चातुर्मास म्हणजे काय, त्यात येणारे महिने, त्याची विज्ञानाशी असणारी सांगड यावर अनेक उदाहरणांद्वारे श्रीमती हिरळीकर यांनी मार्गदर्शन केले. संचालिका सौ. अनुजा बेळगुद्री यांचेही भाषण झाले. माता-पालक संघाच्या सदस्या स्मिता कमतगी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सदस्या डॉ. स्मिता बाकळे यांनी आभार मानले. सौ. कविता कोरी यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------------------------

शिंदे शिक्षणशास्त्रमध्ये विविध उपक्रम
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय गायन, सामूहिक गीत गायन, स्वच्छता मोहीम, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, मतदान नोंदणीची जागृती आदी उपक्रमांना प्रतिसाद मिळाला. डॉ. टी. वाय. पटेल, डॉ. बी. डी. पाटील, प्रा. बी. एस. खोचगे, एस. जे. घाटगे, प्रा. एस. ई. पोवार आदींनी या उपक्रमांचे आयोजन केले. डॉ. अनुमती शर्मा, माजी सैनिक बाबूराव लोहार, करवीरचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांची व्याख्याने झाली. सोनल गिरवले यांनी सूत्रसंचालन केले. धीरज चौगुले यांनी प्रास्ताविक केले. समीक्षा पालकर यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------
सर्वोदयमध्ये आजादी का अमृतमहोत्सव
गडहिंग्लज : सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूलमध्ये आजादी का अमृतमहोत्सव साजरा झाला. संस्थेचे सचिव रवींद्र बेळगुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन केले. सान्वी जाधव, स्नेहा पाटील, ईशान वाघ, आर्या रेडेकर, आर्या जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. झेंडागीत व समूहगीत सादर केले. संचालिका अनुजा बेळगुद्री, मुख्याध्यापिका आराधना चोथे उपस्थित होते. वैष्णवी पालकर, शिवराज बिरंजे यांनी सूत्रसंचालन केले. नववीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले.
------------------------------------------------
शिवराजमध्ये संगणक अभ्यासक्रमावर मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात एज्युनेट फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी संगणक अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. प्रा. सौ. बिनादेवी कुराडे प्रमुख पाहुण्या होत्या. प्लेसमेंट अधिकारी प्रा. बी. एस. पठाण यांनी स्वागत केले. एज्युनेटच्या मुक्ता राऊत यांनी संगणक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. पायथोन लँग्वेज, वेब डेव्हलपमेंट, वेब कॉम्प्युटिंगचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. मुलाखतीच्या तयारीबाबतही माहिती दिली. सौ. कुराडे, प्राचार्य डॉ. कदम यांचे भाषण झाले. प्रा. आझाद पटेल, के. एस. देसाई, प्रा. किशोर अदाटे, प्रा. दीपीका खांडेकर, जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. प्रा. संदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवी खोत यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88379 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..